शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

फुटिरांची फसगत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 12:52 PM

कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले बहुतांश आमदार फसले आहेत.

कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले बहुतांश आमदार फसले आहेत. आता लोकसभा निवडणुकीपूर्वी आलेक्स व दिगंबर कामत यांच्याविषयी भाजप श्रेष्ठी कोणता निर्णय घेतात एवढेच पाहणे या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या हाती आहे.

आठ आमदारांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला त्या घटनेला आता दहा महिने झाले आहेत. येत्या जुलैमध्ये एक वर्ष पूर्ण होईल. गोव्यातील काँग्रेसचे आमदार हे लवकर सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली येत असतात. सत्ताधारी पक्षातली की, मग आपल्या मतदारसंघात विकासकामे होतात, आपल्यालाही सत्तेचे लाभ मिळतात, असे काँग्रेसच्या आमदारांना वाटते आणि ते मग भाजपमध्ये उडी टाकतात. भाजपला विरोधी पक्ष सातत्याने फुटलेले हवे असतात राजकारण हे असेच असते. 

आठ आमदारांपैकी काही आमदारांना वाटते की, भाजपमध्ये जाऊन आपण फसलो काही आमदारांना तर अपेक्षेप्रमाणे महामंडळही मिळाले नाही व मतदारसंघातही वेगाने कामे होत नाहीत. भाजपमध्ये गेलेल्या काही आमदारांच्या नावे अगोदरच पोलिसांत गुन्हे होते. काहीजणांविरुद्ध न्यायालयात खटले आहेत. भाजपमध्ये प्रवेश झाल्याने अशा आमदारांना थोडे संरक्षण मिळाले आहे. पोलिसांकडून आता समन्स देत नाहीत. शिवाय काही पोलिस स्थानकांचे अधिकारी नव्याने भाजपमध्ये आलेल्या आमदारांच्या थोड्या तरी सूचना ऐकतात. हा भाजपमध्ये जाण्याचा फायदा काही आमदार अनुभवतात. पण, मायकल लोबो, संकल्प आमोणकर, डिलायला, दिगंबर कामत किं नृवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांचे भाजप प्रवेशानंतर पूर्ण समाधान झालेले नाही. मंत्रीपद नाही महत्वाचे महामंडळ किंवा पीडीए वाट्याला आलेली नाही, आपले भवितव्य काय असा प्रश्न काही आमदारांना सतावतोय.

कर्नाटकमध्ये नुकतेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने फारच मोठे यश संपादन केले. त्यानंतर सोशल मीडियावर वेगळी चर्चा सुरू झाली. चर्चा अशी की, कर्नाटकचे काही काँग्रेस नेते केंद्रातील भाजपच्या विरुद्ध कर्नाटकमधील भाजप सरकारविरोधात संघर्ष करत राहिले. डी. के. शिवकुमार यांच्यासारख्या कर्नाटकच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षाला तर तुरुंगातही जावे लागले होते. त्यांच्याविरुद्ध सीबीआय व ईडीकडून चौकशी सुरू आहे. मात्र, हे असे नेते कर्नाटकात भाजपला शरण गेले नाही. त्यांनी निवडणुकीत भाजपला जोरदार टक्कर देन घवघवीत यश मिळवले. पूर्ण देशाचे लक्ष कर्नाटकच्या काँग्रेसने स्वतकडे वेधून घेतले. ३४ वर्षानंतर काँग्रेसला कर्नाटकात एवढे भव्य यश प्राप्त झाले आहे. भाजपने कर्नाटक निवडणुकीत खूप पैसा खर्च केला, पण पराभव झाला. गोव्याहून जे भाजपवाले कर्नाटकात प्रचारासाठी गेले होते, त्यांना पैसा किती व कसा खर्च झाला ते ठाऊक आहे. काँग्रेसचे कर्नाटकचे नेते दबावाखाली न येता भी टक्कर देता ती टक्कर गोव्यातील काँग्रेस नेते का देऊ शकत नाहीत, ही सोशल मीडियावरील प्रश्नार्थक चर्चा आहे. 

गोव्यातील काँग्रेसच्या नेत्यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकचेच नेते दिनेश गुंडू राव यांचे मार्गदर्शन लाभले होते. मायकल लोबो वगैरे तर पूर्णपणे दिनेश राव यांचे ऐकत होते. लोबो यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात दिनेश राव यांची त्यावेळी मोठी भूमिका होती. मात्र, लोबो यांनी अगोदर लिडर ऑफ अपनपद सोडले व मग पक्षही सोडला. दिगंबर कामत हेही एकावेळी विरोधी पक्षनेते होते. बाबू कवळेकर यांना देखील काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद दिले होते. हे सगळे नेते गांवर काँग्रेसला गुड बाय म्हणून झालेतील संघर्ष करण्यास घाबरणारे नेते आपला पक्ष सोडून लवकर भाजपमध्ये जातात व त्यापैकी काहीजण पराभूत होऊन नंतर घरी बसतात. 

आज इजिदोर फर्नाडिस, बाकर किलीप मेरी क्लाफास डायस टोनी रॉड्रिग्ज, दयानंद सोपटे, मगोतून गेलेले बाबू आजगावकर, दीपक पाऊसकर असे अनेकजण घरी आहेत. भाजपमध्ये आपण गेली नसतो तर आज देखील आपण आमदार म्हणून विधानसभेत असतो, असे यापैकी काहीजण पत्रकारांना खासगीत सांगतात. जळगावच्यासह अनेक माजी आमदारांना भाजपमध्ये जाण्याची घाई झाली होती. ते सगळे पराभूत झालेले आहेत. यावेळी जे हरले त्यापैकी अनेकजण पुढील विधानसभा निवडणुकीत देखील पुन्हा जिंकून येण्याची शक्यता दिसत नाही. 

शिवाय दहा महिन्यांपूर्वी ज्या आमदारांनी भाजपमध्ये उही घेतली आहे, त्यापैकी केदार नाईक राजेश फळदेसाई, संकल्प, दोल्फ फर्नाडिस अशा काही आमदारांची पुढील निवडणुकीत कसोटीच आहे. काहीजण वन टाईम आमदार म्हणून इतिहासातनोंद होतील हे पूर्वीच्या अनुभवावरून सांगता येते. गेल्या जुलै महिन्यात आठ आमदार काँग्रेस पक्ष सोडून गेले. आता फक्त तीन आमदार राहिले आहेत. युरी आलेगाव यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद आहे. युरी काँग्रेसनिष्ठ आहेत. हळदोणेचे आमदारांचे मन कधी कधी स्थिर नसते. पेये आमदार एक्टन यांची मैत्री गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांच्याशी आहे. लोबो, कामत भाजपमध्ये गेले तेव्हा कामत यांच्या काही खास माणसांनी एल्टन यांनाही भाजपमध्ये नेण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. पण विजय आणि एका भाजप मंत्र्यानेच तो प्रयत्न हाणून पाडला. आता एल्टन काँग्रेसमध्येच राहतील, कारण भाजपचीही बसगाड़ी सध्या पूर्ण भरलेली आहे भाजपलाही आणखी आमदार नको आहेत.

आलेक्स सिक्वेरा यांना भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी पक्षात घेतले तेव्हा मुख्यमंत्री सावंत यांनी त्यांना मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले होते. संकल्प आमोणकर यांना आपल्याला देखील मंत्रीपद मिळेल, असे वाटत होते. संकल्प व आलेक्सचा अपेक्षाभंग झाला आहे. संकल्प यांना महत्वाचे असे कोणतेच महामंडळही मुख्यमंत्री देऊ शकले नाहीत. रुदोल्फ फर्नांडिस है सांताक्रूझचे आमदार तेवढे समाधानी आहेत. कारण त्यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये जाताना मोठे बक्षिस देण्याची ग्वाही भाजपने दिली होती. ते बक्षिस दोल्फना मिळाले. आलेक्स सिक्वेरा यांना खरोखर मंत्रीपद देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री सावंत यांनी करून पाहिला. मात्र, आणखी खिस्ती मंत्री मंत्रिमंडळात नको, अशी भूमिका संघाची आहे. हिंदू मंत्र्याला डच्चू देऊन ख्रिस्तीधर्मिय मंत्री वाढवू नका. ही संघाची भूमिका मुख्यमंत्री सावंत यांनाही कळाली आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गोवा मंत्रिमंडळात फेरबदल करण्यास मान्यता दिलेली नाही. कर्नाटक निवडणुकीमुळे भाजपला दिसून आलेच की, अल्पसंख्यांची ८० टक्के मते काँग्रेसला मिळाली आहेत त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व अधिक सतर्क झाले आहे. आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद दिले म्हणून दक्षिण गोव्यात भाजपची खिस्ती मते लोकसभा निवडणुकीत वाढतील, अशी स्थिती मुळीच नाही, हे गोवा भाजपच्याच काही मंत्री व आमदारांनी दिल्लीत सांगितले आहे. 

आलेक्सना मंत्रीपद मिळणे आता अधिक कठिण झाले आहे.दिगंबर कामत यांना भाजपने अजून पक्षात महत्वाचे पद दिलेले नाही. त्यांना ते पुढे मिळू शकते. मात्र मंत्रीपद मिळण्याची नाही. लोकसभा निवडणुकीवेळी दक्षिणेतून कामत यांना तिकीट दिले जाईल, असा दावा देखील काही भाजप पदाधिकारी करतात. वास्कोचे आमदार दाजी साळकर यांच्याकडे पीडीए आहे. कामत यांना मंत्रिपद देऊन टीसीपी खाते त्यांच्याकडे सोपवले जाईल, अशी चर्चा कामत यांचे दोन खास कार्यकर्ते अधूनमधून पसरवतात. कामत यांचे यापुढे राजकीय भवितव्य काय हे गृहमंत्री अमित शाह यांनीही अजून स्पष्ट केलेले नाही. शाह यांना अलिकडेच कामत भेटले आहेत.

मायकल लोबो यांना भाजपने अजून पूर्णपणे आपले मानलेले नाही. हा टर्म पूर्ण होईपर्यंत तरी लोबो यांना महत्त्वाचे महामंडळ वगैरे मिळणार नाही हे मायकल यांनाही स्वतला ठाऊक आहे. लोबो यांचे सर्वच राजकीय निर्णय गेल्या दोन वर्षात चुकत गेले आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले बहुतांश आमदार फसले आहेत. आता लोकसभा निवडणुकीपूर्वी आलेक्स व दिगंबर कामत यांच्याविषयी भाजप श्रेष्ठी कोणता निर्णय घेतात एवढेच पाहणे या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या हाती आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण