पणजी : महिला कार्यकर्त्याकडून राज्यभर नारळ विक्रीचे जे आंदोलन केले गेले, त्याची टिंगल व चेष्टा करणारी भाषा मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी चालवली आहे, असे महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, उपाध्यक्ष बिना नाईक, सावित्री कवळेकर आदी पदाधिका-यांनी बुधवारी येथे सांगून र्पीकर यांच्यावर टीका केली. महिलांच्या आंदोलनाबाबत अपमानास्पद भाषा वापरणा-या मुख्यमंत्री पर्रिकर यांना माफ केले जावे. कारण ते काय बोलतात ते त्यांनाच अलिकडे कळत नाही,असे कुतिन्हो म्हणाल्या.
राज्यात नारळाचे दर प्रचंड वाढलेले असल्याने महिला काँग्रेसच्या कार्यकत्र्यानी उन्हात बसून राज्यातील सर्व महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये नारळ विक्री केली. हजारो लोकांनी या आंदोलनाला प्रतिसाद दिला. कारण महागाईचा परिणाम महिलांना भोगावा लागत आहे. मात्र मुख्यमंत्री र्पीकर यांनी महिलांच्या या व्यथेची व महिला आंदोलनाची चेष्टा करणारी विधाने डिचोलीत नुकतीच केली, असे कुतिन्हो व बिना नाईक म्हणाल्या. आपण दरमहा दोन हजार रुपयांचा गृह आधार महिलांना देत असल्याने त्यातून महिला नारळ खरेदी करू शकतात, अशा अर्थाचे अशोभनीय विधान र्पीकर यांनी केल्याचे श्रीमती कुतिन्हो म्हणाल्या. पर्रिकर हे स्वत:च्या खिशातून पैसे देत नाहीत. महिलांना जो गृह आधार मिळतो, तो करदात्यांचा पैसा आहे. लोकांनी कराद्वारे भरलेला तो पैसा आहे हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावे व पुन्हा अशा प्रकारची विधाने करू नयेत. महिला काँग्रेसच्या कार्यकत्र्यानी केलेल्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री निराश झाले असल्याने त्या निराशेतून त्यांनी केलेली विधाने आम्ही समजतो व त्यामुळेच त्यांना माफ करावे अशी भूमिका घेत असल्याचे कुतिन्हो म्हणाल्या.
पर्रिकर यांनी विरोधात असताना माध्यमप्रश्नी आंदोलन केले होते. कॅसिनोविरोधातही आंदोलन केले होते. त्या सर्व आंदोलनांची छायाचित्रे महिला काँग्रेस कार्यकत्र्यानी यावेळी पत्रकार परिषदेत नव्याने प्रकाशित केली. इंग्लीश व्हाय, मायभास कोंकणी जाय असे लिहिलेली टी-शर्ट र्पीकर आंदोलनावेळी घालायचे. कॅसिनोंना हद्दपार करीन अशा गजर्ना ते करायचे. प्रत्यक्षात र्पीकर यांनी त्यांच्या प्रत्येक आंदोलनाबाबत नंतर घुमजाव केले, असे कुतिन्हो, कवळेकर आदी म्हणाल्या. महिला कार्यकत्र्या नारळ विक्रीचे आंदोलन केवळ प्रसिद्धीसाठी करत आहेत असे म्हणणा:या र्पीकर यांनी व भाजपानेही कांदे विक्रीसारखी आंदोलने कोणत्या प्रसिद्धीसाठी व स्टंटसाठी केली होती असा प्रश्न कुतिन्हो यांनी विचारला. दोन महिने नारळ विकत बसा असे म्हणणा:या र्पीकर यांचे आव्हान आम्ही स्वीकारतो. जर सरकारने लोकांना अनुदानित दराने व कमी किमतीत नारळ दिले नाही तर आम्ही वर्षभर आंदोलन करू. गोव्यातील महिलांच्या क्षमतेला मुख्यमंत्र्यांनी कमी समजू नये. निदान महिलांविषयी बोलताना तरी र्पीकर यांनी योग्य ती व पदाला शोभणारी भाषा वापरावी असे बिना नाईक व कुतिन्हो म्हणाल्या.