पणजी : आम आदमी पार्टी आणि गोवा फॉरवर्ड पार्टी, हे दोन्ही पक्ष काँग्रेसचीच व्होट बँक फोडू पाहत आहेत. पण काँग्रेस पक्ष गोवा विधानसभेची निवडणूक चाळीसही मतदारसंघात स्वबळावरच लढविल, असे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व गोवा प्रभारी दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारी सांगितले. काँग्रेस पक्षाला भ्रष्ट म्हणणारे अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी त्यांची स्वतंत्र वाट चोखाळावी, असा सल्लाही त्यांनी दिला. गोव्यातील काँग्रेसच्या समन्वय समितीची बैठक आपण गुरुवारी दिल्लीत घेतली. गोवा विधानसभेसाठी आम्ही त्या बैठकीत रणनीती निश्चित केली आहे. भाजपा सरकारवर लवकरच आम्ही आरोपपत्र सादर करू. तसेच निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा तयार करू, असे ते म्हणाले. गोव्यात मनोहर पर्रीकर हे ‘सुपर सीएम’ असल्याचे आम्ही वारंवार सांगत आहोत. पर्रीकर हे नावापुरतेच संरक्षण मंत्री आहेत, असे सिंह म्हणाले. (खास प्रतिनिधी)
गोव्यात काँग्रेस स्वबळावरच लढणार
By admin | Published: June 04, 2016 3:29 AM