आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार; प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 01:30 PM2023-02-14T13:30:37+5:302023-02-14T13:31:40+5:30
भाजप खोटारडा पक्ष असून ट्रिपल इंजिन सरकार सपशेल अयशस्वी असल्याची टीका अमित पाटकर यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क, हरमल: आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर स्वतंत्र लढवणार आहे. मागील निवडणुकीत युती पक्षाला उमेदवारी दिल्याने काँग्रेसच्या मतदारांत प्रचंड नाराजी होती. त्यामुळे मांद्रे व गोव्यात पक्षबांधणीसाठी संघटना सज्ज आहे. भाजप खोटारडा पक्ष असून ट्रिपल इंजिन सरकार सपशेल अयशस्वी असल्याचे मत गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केले.
मांद्रे मतदारसंघात काँग्रेसचा हाथ से हाथ जोडो' अभियान राबवण्यासाठी तसेच गट काँग्रेसचे कार्य पुढे नेण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्याची हरमल येथील बैठक झाली. भाजपा ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असून ट्रिपल इंजिन सरकार आहे. पंतप्रधान मोदी, कर्नाटकचे मुख्यमंत्री भाजपचे व गोव्यात भाजपचे मुख्यमंत्री यांनी म्हादईचा प्रश्न सहज सोडवायला हवा होता.
कर्नाटकात गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. प्रमोद सावंत हे निर्णय घेतेवेळी पक्षाबरोबर होते. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री सावंत हे भागीदार व त्यांनी म्हादई विकली, असा आरोप पाटकर यांनी केला. एसईझेड, प्रादेशिक आराखडा सारखे प्रकल्प रद्द करण्यासाठी काँग्रेसने भाग पाडले होते. दिल्लीतील जंतरमंतर येथे म्हादईसाठी काँग्रेसने विरोध केला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"