मडगाव - पेट्रोल आणि डिझेलचे केंद्र सरकारने जे दर वाढविले आहेत त्याच्याविरिद्ध गोव्यात काँग्रेसने जे आंदोलन सुरू केले आहे ते गाव व तालुका पातळीवर नेण्यात येईल अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.काँग्रेसचे गट कार्यकर्त्याद्वारे हे आंदोलन गाव पातळीवर नेण्यात येणार असून, मंगळवारी याची सुरवात सांगे आणि वाळपई येथील गटा कडून केली गेली.
चोडणकर म्हणाले, भाजप सरकारने डिझेलवर अबकारी कर 820 टक्के तर पेट्रोलवर 258 टक्के केला आहे. त्यावर गोवा सरकार पेट्रोलवर 25 टक्के तर डिझेलवर 22 टक्के व्हॅट कर आकारत आहे. आशियात इतर देशात पेट्रोलच्या किमती 45 ते 60 रुपये पर्यंत सीमित असताना फक्त भारतात दर 80 रुपये प्रति लिटर एवढी आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. काँग्रेस कार्यकर्ते वाढलेल्या वीज बिलावरही आवाज उठविणार असे त्यांनी सांगितले