काँग्रेस घेणार निवडणुकीत काम न केलेल्यांची माहिती; प्रभारी माणिकराव ठाकरे गोवा भेटीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2024 07:09 IST2024-05-31T07:08:35+5:302024-05-31T07:09:23+5:30
ठाकरे हे गोवा भेटीवर आले आहेत.

काँग्रेस घेणार निवडणुकीत काम न केलेल्यांची माहिती; प्रभारी माणिकराव ठाकरे गोवा भेटीवर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: काँग्रेस पक्षाच्या कोणत्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी काम केले नाही त्याची माहिती घेणार असल्याचे काँग्रेसचे गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे. ठाकरे हे गोवा भेटीवर आले आहेत.
काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी निवडणुकीत प्रचार काम केले नसल्याचे जे बोलले जाते या विषयी विचारले असता माणिकराव ठाकरे म्हणाले की, याची सविस्तर माहिती पक्षाकडून घेतली जाईल. कोणी कोणी काम केले नाही त्यांची नावे घेतली जातील आणि त्यानंतर काय करायचे त्याचा निर्णयही पक्षाकडून घेतला जाईल, असे ते म्हणाले.
गोव्यात उत्तर आणि दक्षिण गोवा मतदारसंघात काँग्रेसचाच विजय होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. आता जशी लोकसभा निवडणूक विरोधकांनी एकदिलाने लढली तशीच युती पुढेही राहणार आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, गोव्यातील इंडिया आघाडीची बैठक शुक्रवारी होणार आहे.