शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

ट्रकचालकांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष : राणे

By admin | Published: September 21, 2015 1:54 AM

पणजी : खाण व्यवसायात अतिमहत्त्वाची बाजू उचलून धरणाऱ्या ट्रकचालकांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी गेले कित्येक दिवस गोवा ट्रकचालक संघटनेकडून करण्यात येत आहे;

पणजी : खाण व्यवसायात अतिमहत्त्वाची बाजू उचलून धरणाऱ्या ट्रकचालकांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी गेले कित्येक दिवस गोवा ट्रकचालक संघटनेकडून करण्यात येत आहे; पण राज्याचे मुख्यमंत्री आमच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप शिवसेनेचे राज्यप्रमुख अजितसिंग राणे यांनी केला. पणजी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी गोवा ट्रकचालक संघटनेचे अध्यक्ष विष्णू सावळ, शिवसेना तिसवाडी तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, समीर च्यारी, कायदा सल्लागार कृष्णा नाईक आणि इतर सदस्य उपस्थित होते. गेले अनेक दिवस ट्रकचालकांना आर्थिक मदतीचे पॅकेज देण्याची मागणी सरकारकडे करण्यात येत आहे; पण ही मागणी जास्त होते आणि इतके पैसे सरकारकडे नाहीत, असे सांगून ट्रकचालकांची दिशाभूल करण्याचे काम सरकार करत आहे. आम्ही सरकारकडे आमच्या हक्काचे पैसे मागत आहोत, भीक मागत नाही, असे उद्गार त्यांनी या वेळी काढले. आॅक्टोबर महिन्यात खाणी सुरू करण्यात येतील, असे सांगितले जात आहे; पण त्याबाबत कोणतीही ठोस भूमिका किंवा पाऊल सरकार उचलत नाही, असा आरोपही या वेळी राणे यांनी केला. (प्रतिनिधी)