पणजी - गँगस्टर विशाल गोलतकर याच्या हत्येच्या प्रकरणात एका नव्यानेच पोलीस सेवेत भरती झालेला पोलीस कॉन्स्टेबल सहभागी असल्याचे पोलीस तपासातून उघडकीस आले आहे. अमेय वळवईकर यावाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या कॉन्स्टेबलला जुनो गोवा पोलिसांनी अटक केली आहे.
संशयित अमेय याची या खून प्रकरणात भुमिका आढळून आली आहे. साई ऊर्फ कोब्रा याच्या साथिदारांशी अमेयचा संबंध होता असेही आढळून आले आहे. तसेच कोब्राच्या विशालचा खून करण्याच्या कारस्थानाची माहिती अमेयला ठावूक होती असेही तपासातून आढळून आले आहे. अमेयची या खून प्रकरणात नेमकी काय भुमिका होती हे मात्रअद्याप जुने गोवा पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेले नाही. दिवसा अखेर त्याचांही खुलासा पोलीस अधीक्षक निधीन वालसान करतील अशीअपेक्षा आहे.
विशाल गोलतकर याचा मृतदेह रविवारी दुपारी मेरशी येथील ‘अपनाघर’जवळ रस्त्याच्या बाजूला झाडीत सापडला होता. त्याच्यावर धारधारशस्त्रांनी वार केल्याचे आढळून आल्यामुळे विशालचा खून झाल्याचे स्पष्टसंकेत मिळत होते. त्यामुले पोलिसांनी त्या. दृष्टीने तपास चालविला. तपासाचा झंझावात उडवून देताना अवघ्या काही तासात जुने गोवापोलिसांनी खुन्यांना जेरबंद केले. विशालचाच मित्र असलेला कोब्रा वत्याच्या साथिदारांनी मिळून हा खून केल्याचे तपासातून आढळून आले. तसेच कोब्रा आणि त्याच्या साथिदारांनी शेवटी त्याची कबुलीही दिली. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश होता.
रात्रीच लागली होती सुलूस
या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कोब्रा व त्याच्यासाथिदारांच्या कोठडीतील चौकशीनंतर या प्रकरणात नवा नवा पोलीस बनलेल्या अमेयचा सहभाग असल्याचे आढळून आले होते. पत्रकार परिषदेत बोलताना उत्तर गोव्याचे अधीक्षक निधीन वालसान यांनी याप्रकरणात आणखी संशयितांना अटक केली जाण्याची शक्यता वर्तवून तसे संकेतही दिले होते. सोमवारी सकाळी निरीक्षक सतीश पडवळकर हे आपली टीम घेऊन वाळपई पोलीस प्रशिक्षक केंद्रात दाखल झाले आणि अमेयला अटक केली.