शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

भाजपमध्ये धर्मगुरुंच्या विषयावरून वादाचा स्फोट; मंत्र्यांकडून पक्षाला घरचा अहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2024 12:58 PM

काँग्रेसची पोलिसांत तक्रार.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दक्षिण गोव्यातील पराभवाला ख्रिस्ती धर्मगुरुच कारण असल्याचा आरोप भाजपने केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी धर्मगुरुंना दोष देऊ नका, कुठे कमी पडलो याबद्दल आत्मचिंतन करा, असा सल्ला देऊन स्वकीयांना घरचा अहेर दिला, तर सरकारात घटक असलेले मगोपचे नेते वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनीही माविन यांची 'री' ओढली. दूसरीकडे काँग्रेसने पोलिसांत धाव घेतली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ४ जून रोजी निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दक्षिण गोव्यात खिस्ती धर्मगुरुंच्या हस्तक्षेपामुळेच पल्लवी धेपे हरल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बुधवारी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर व भाजप प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनीही या आरोपांचा पुनरुच्चार केला. दक्षिण गोव्यात भाजप संपलेला नाही, असा दावा करून ख्रिस्ती धर्मगुरुंनी भाजपविरोधात कारवाया केल्या म्हणूनच पल्लवी यांना पराभव पत्करावा लागल्याचा आरोप केला. निवडणुकीच्या आधी चर्च संस्थेच्या बड्या प्रतिनिधींनी तानावडे यांना चर्चेसाठी बोलावले. परंतु बैठक संपल्यानंतर एकत्रपणे फोटो काढू. अशी विनंती तानावडे यांनी केली तेव्हा या प्रतिनिधींनी फोटो काढण्यास नकार दिला. यावरून त्यांच्या मनात भाजपबद्दल असलेला गैरहेतू उघड होतो, असेही संकल्प यांनी म्हटले होते.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ढवळीकर म्हणाले की, 'सत्य हे सत्य असून, ते अबाधित आहे. काही गोष्टी कितीही लपवल्या तरी झाकून राहत नाहीत. पराभवाच्या बाबतीत धर्मगुरुंवर निशाणा साधणे चुकीचे आहे. धर्मगुरु, मग तो ख्रिस्ती असो किंवा हिंदू चांगल्या गोष्टी सांगून समाजाला प्रबोधन करण्याचे काम ते करत असतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंदू धर्मगुरुंनी जो काही उपदेश केला तो हिंदू धर्मीयांनी मानून घेतला व ख्रिस्ती धर्मगुरुंनी जे काही सांगितले होते, त्याचे पालन ख्रिस्ती बांधवांनी केले. निवडणुका आता पार पडलेल्या आहेत. आम्ही एकमेकांच्या धर्मगुरुंवर दोषारोप करणे योग्य नव्हे.'

जातीयवादाचा भाजपला फटका

भाजपने दक्षिण गोव्याचा पराभवाला धर्मगुरुना जबाबदार धरू नये. आमदार संकल्प आमोणकर व गिरीराज पै वेर्णेकरांनी ख्रिस्त धर्मगुरुंच्या हस्तक्षेपामुळे पराभव झाला असे विधान केले आहे, त्याचा आम्ही निषेध करतो, असे गोवा तृणमूल काँग्रेसचे नेते समील वळवईकर यांनी सांगितले. भाजपने आतापर्यंत जातीय राजकारण केले आहे. त्याचाच त्यांना फटका बसला आहे. दक्षिण गोव्याच्या जनतेचा लोकशाहीवर विश्वास आहे म्हणून त्यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणले आहे, असेही ते म्हणाले.

कुठे कमी पडलो; आत्मचिंतन करावे

खिस्ती धर्मगुरुंवर केलेल्या या आरोपांवर पत्रकारांनी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, एकमेकांच्या धर्मगुरुंना दोष देण्यापेक्षा आपण कुठे कमी पडलो याबाबत आत्मचिंतन करणे उचित ठरेल. प्रदेशाध्यक्षांनी निकालानंतर तात्काळ दिलेली ती प्रतिक्रिया होती. निवडणुका येतात व जातात. आता सर्व काही पार पडलेले आहे. त्यामुळे लोकांची कामे करण्याला प्राधान्य देऊया. दरम्यान, माविन हे दाबोळी मतदारसंघाचे आमदार आहेत. दाबोळीतही भाजपला मर्यादितच आघाडी यावेळी मिळाली.

आमचे कार्यकर्तेच कमी पडले

राज्यात भाजपसोबत सत्तेत असलेले मगोपचे ज्येष्ठ नेते वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनीही धर्मगुरूंना दोष देऊन चालणार नाही, असे मत व्यक्त करून दक्षिणेत काही मतदारसंघांमध्ये आमचे कार्यकर्तेच कमी पडले, असे बोलून दाखवले. ते म्हणाले की, आमचे कार्यकर्ते म्हणजे मला मगोपचे मडकईतील कार्यकर्ते, असे म्हणायचे आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपा