सूरज नाईकपवार , मडगाव: गोव्यातील सासष्टी तालुक्यातील सां जुझे द अरियाल येथे श्री छत्रपती महाराजांचा पुतळयावरुन वाद उदभवला व ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे ते सरकारने ताबोडतोब मागे घ्यावे अशी मागणी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दीन यांनी केली आहे. आज बुधवारी मडगावात दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आपण या हल्ल्याचे समर्थन करीत नाही असेही त्यांनी सांगितले.त्याबाबत आपल्यालाही दुख झाले आहे.पुतळा उभारताना स्थानिक पंचायतीला विश्वासात घेतले पाहिजे होते. तसेच स्थानिकांनाही त्याबाबत प्रोत्साहित केले पाहिजे होते. आम्हीही शिवाजी महाराजांचा आदर करीत आहेत असेही त्यांनी सांगितले. झाले गेले ते विसरा असे सार्दीन म्हणाले.
सोमवार दि. १९ फेब्रुवारी रोजी गोव्याचे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई हे सां जुझे द अरियाल भागातील बेनाभाट येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करुन परत जात असताना तेथे जमलेल्या जमावाने त्यांना घेराव घालून दगडफेक केली होती. या प्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी सां जुझे द अरियाल पंचायतीचे सरपंच लिंडा फर्नांडीस, उपसरपंच वालेन फर्नांडीस सह एकूण २० जणांवर गुन्हा नोंद केला आहे.