पणजी: अजमेर- राजस्थान येथील विधानसभा निवडणूकीच्या मतदानावेळी तैनात गोवा पोलिसांच्या पथकाने मतदानासाठी जाण्यास लोकांना मदत केली. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती ज्यांना मतदान केंद्रांवर जाण्यास अडचण येत होती, त्यांना गोवा पोलिस कर्मचाऱ्यांनी केंद्रा पर्यंत जाण्यास सहाय्य केले.काहींना त्यांनी व्हिलचेअर वरुनही मतदान केंद्रात सोडले. तसेच पोलिसांनी मतदान केंद्राबाहेर मतदारांना मार्गदर्शनही केले. त्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.
राजस्थान येथे विधानसभा निवडणूकीसाठी टप्प्या टप्प्याने मतदान होत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मतदान नुकतेच पार पडले. या निमित गोवा शस्त्र पोलिस कर्मचाऱ्यांना अजमेर जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये ड्युटीसाठी तैनात केले आहेत. यावेळी हे कर्मचारी आपली ड्युटी सतर्क राहून मतदान केंद्राबाहेर बजावताना दिसून येत आहेत. मतदानावेळी कुठलिही अनुचित घटना घडली नाही. मतदान शांततेत पार पडले. गोवा शस्त्र पोलिसांचे हे पथक खास निवडणूक ड्युटीसाठी तैनात केले आहेत. त्यामुळे राजस्थान येथील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते गोव्यात परतणार आहे.