पर्वरी : सहकार क्षेत्राला अच्छे दिन आले आहेत आणि यापुढेही येणार आहेत. समाजात सहकार संस्था उत्तम काम करतात. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या काम करणाऱ्या संस्था उत्तम गणल्या जातात. मी स्वत: सहकार भारतीच्या माध्यमातून तयार झालो आहे. गुणात्मक विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. ‘एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ याप्रमाणे सर्वांनी सहकाराची भावना घेऊन कार्य करणे गरजेचे आहे, असे उद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथील सहकार भारतीच्या महाअधिवेशनात काढले. गोव्यातील आपल्या भेटीत त्यांनी मुद्दाम सहकार भारतीच्या महाअधिवेशनाला उपस्थिती लावली होती. आपल्या ओघवती भाषणात त्यांनी पुढे सांगितले की, संस्था निर्माण करताना अनेक असंतुष्ट व्यक्ती अडचणी निर्माण करतात; परंतु त्यातूनही सहकार संस्था उत्तमरीत्या चालतात. सहकार क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्यास प्रोत्साहित करावे आणि गुन्हा करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी माझी आग्रही भूमिका आहे. गोव्याच्या बंदराबद्दल बोलताना ते म्हणाले की, गोव्याला निसर्गाने बंदर प्राप्त झाले आहे; परंतु तीन लाख टन क्षमतेचे जहाज येथे लावू शकत नाही. पीपीपी अंतर्गत निविदा मागवा मी ती यशस्वी करून दाखवितो. यासंबंधीची बोलणी राज्य सरकारपाशी झाली असून ती योजना यशस्वी झाल्यात जमा आहे. खात्री बाळगा. सध्या खाण व्यवसाय बंद आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. देशभर कोटींची ई-टोलची योजना आखली असून देशाला सुमारे कोटीचा फायदा आणि वाहनचालकांच्या वेळेची बचत झाली आहे. उत्तम नेतृत्व लाभले तर उत्तम शासन व्यवस्था लाभेल, असे त्यांनी पुढे सांगितले. (प्रतिनिधी)
सहकार क्षेत्राला अच्छे दिन
By admin | Published: November 03, 2014 1:46 AM