शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

गोव्यात ‘कोरोना’ निगा केंद्रे वाढवली, एमपीटी इस्पितळही आता ‘कोविड’ स्पेशल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 5:01 PM

सर्वप्रथम ७ जून रोजी शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्र ‘कोरोना’ निगा केंद्र जाहीर करण्यात आले

पणजी : गोव्यात ‘कोरोना’ निगा केंद्रांची संख्या वाढवून अधिकाधिक रुग्णांना तेथे सामावून घेण्यासाठी सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिका-यांनी हेडलॅण्ड सडा येथील एमपीटीचे इस्पितळ असिम्प्टोमेटिक संसर्गितांसाठी ‘कोविड’ निगा केंद्र म्हणून अधिसूचित केले आहे. सर्वप्रथम ७ जून रोजी शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्र ‘कोरोना’ निगा केंद्र जाहीर करण्यात आले, त्यानंतर १२ जून रोजी कोलवा येथील पर्यटन विकास महामंडळाची रेसिडेन्सी १२ जूनपासून कोविड निगा केंद्र जाहीर केले. त्यानंतर शनिवारी केपे येथील सरकारी कला व विज्ञान महाविद्यालय इमारत कोविड निगा केंद्र जाहीर केले.सरकार कोविड निगा केंद्रांची संख्या वाढवत असले तरी काही ठिकाणी या केंद्रांना स्थानिकांकडून मज्जावही केला जात आहे. प्रारंभीच शिरोडा येथे स्थानिकांनी मज्जाव केला. आता वास्कोतही एमपीटीचे इस्पितळ कोविड संसर्गितांसाठी  घेतल्यास या इस्पितळावर अवलंबून असलेल्या तब्बल १५ हजार स्थानिकांनी कुठे जावे?, असा प्रश्न केला जात आहे. रुग्ण पाचशेंच्या उंबरठ्यावर!४१ नवे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ४९0 झाली आहे. गेल्या २४ तासात एकूण ४ पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी गेले. मांगोरहिलमध्ये आणखी २९ तर केपेंमध्ये २ पॉझिटिव्ह आढळले. पाचशेंच्या उंबरठ्यावर असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मांगोरहिलचे रुग्ण सर्वात जास्त आहेत. तेथील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या २७२ झालेली आहे तर मांगोरहिलशी संबंधित रुग्णांचा आकडा १४७ वर पोचला आहे. केपें येथे २ तर मडगांव व बेती येथे २ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. रस्ता, रेल्वे विमानाने आलेले आणि पॉझिटिव्ह आढळलेले ६७ रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण ७४ पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी गेले. ३0५ जणांचे अहवाल प्राप्त व्हायचे आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या