शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

२२ दिवसात गोव्यातून ४ हजार २३९ विदेशी पर्यटकांना मायदेशी पाठवलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 10:16 PM

दाबोळी विमानतळावर २३ खास विमाने येऊन गोव्यात लॉकडाऊन मुळे अडकलेल्या विदेशी पर्यटकांना घेऊन मायदेशी परतली

पंकज शेट्ये 

वास्को: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देश भरात लागू केलेल्या लॉकडाऊन मुळे गोव्यात अडकलेल्या विविध राष्ट्रातील पर्यटकांना मायदेशी पाठवण्यासाठी मागच्या २२ दिवसात उत्तम पावले उचलण्यात आलेली आहेत. बुधवारी (दि. १५) भारतात लॉकडाऊन लागू करून २२ दिवस पूर्ण झाले असून याकाळात दाबोळी विमानतळावर दाखल झालेल्या २३ खास विमानातून ४२३९ विविध राष्ट्रातील नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले आहे. गोव्यात अजूनही काही विदेशी पर्यटक अडकून राहीलेले असून त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी येणाऱ्या दिवसात उचित पावले उचलण्यात येणार असल्याची माहीती दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी त्यांच्याशी संपर्क केला असता दिली.

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी भारतात २५ मार्च पासून लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. लॉकडाऊन लागू केल्यानंतर इतर ठिकाण्याबरोबरच गोव्यातील विमानसेवा सुद्धा सद्या रद्द करण्यात आलेली आहे. लॉकडाऊन लागू केल्याने गोव्यात विविध राष्ट्रातील शेकडो विदेशी पर्यटक अडकून राहीले होते. या विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी उचित पावले उचलल्यानंतर २५ मार्च ते १५ एप्रिल (आज पर्यंतचा आकडा) अशा काळात ४२३९ विदेशी नागरिकांना अजून पर्यंत त्यांच्या राष्ट्रात सुखरूप रित्या पाठवण्यात आलेले असल्याची माहीती दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी दिली. या विदेशी नागरिकांना त्यांच्या राष्ट्रात नेण्यासाठी दाबोळी विमानतळावर अजून पर्यंत २३ खास विमाने दाखल झाल्यानंतर यातून सदर पर्यटक त्यांच्या मायदेशी परतले आहेत. मागच्या २२ दिवसात दाबोळी विमानतळावरून मायदेशी परतलेल्या या विदेशी पर्यटकात रशिया, स्पेन, जर्मनी, युनायटेड किंगडम, इस्त्राईल, अमेरिका, पोलंड, कजाकीस्तान इत्यादी विविध राष्ट्रातील नागरिकांचा समावेश असल्याची माहीती दाबोळी विमानतळावरील सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. मागच्या २२ दिवसात गोव्यातून विविध राष्ट्रात पाठवण्यात आलेल्या या नागरिकांमध्ये ३८ चिमुकल्यांचा समावेश असल्याची माहीती विमानतळावरील सूत्रांकडून प्राप्त झाली. लॉकडाऊनमुळे गोव्यात अजूनही विविध राष्ट्रातील काही विदेशी पर्यटक अडकून राहीलेले असल्याची माहीती दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक यांच्याकडून प्राप्त झाली असून त्यांना सुद्धा त्यांच्या देशात पाठवण्यासाठी लवकरच उचित पावले उचलण्यात येणार असल्याचे सांगितले. लॉकडाऊन नंतर गोव्यात अडकलेल्या विविध राष्ट्रातील नागरिकांना मायदेशी पाठवण्यात येत असताना येथे सुरक्षेच्या दृष्टीने विविध प्रकारची पावले उचलण्यात आलेली असल्याची माहीती विमानतळ सूत्रांकडून प्राप्त झाली. कोरोना चा फैलाव होऊ नये याची खबरदारी बाळगताना दाबोळी विमानतळावरून विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येत असताना सामाजिक अंतर ठेवणे (सोशल डीस्टेंन्सींग), दाबोळी विमानतळ इमारतीची वेळोवेळी स्वच्छता करणे, औषधांची फव्वारणी करणे अशा प्रकारची पावले उचलण्यात आलेली असून भविष्यातही सुरक्षेच्या दृष्टीने उचित पावले उचलण्यात येणार असल्याची संचालक गगन मलिक यांनी त्यांच्याशी चर्चा करताना सांगितले.बुधवारी २३ वे खास विमान दाबोळी विमानतळावर आल्यानंतर ४४ अमेरिकन प्रवाशांना घेऊन मायदेशी जाण्यासाठी झाले रवानालॉकडाऊन झाल्यानंतर गोव्यात अडकलेल्या विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी विविध प्रकारची पावले उचलण्यात आलेली आहेत. बुधवारी (दि. १५) लॉकडाऊन च्या काळातील २३ वे खास विमान गोव्याच्या दाबोळी विमानतळावर आल्यानंतर येथे अडकलेल्या ४४ अमेरिका राष्ट्रातील नागरिकांना घेऊन प्रथम मुंबईला रवाना झाले. सदर अमेरिका राष्ट्रातील पर्यटक गोव्यातून मुंबईला पोचल्यानंतर तेथून त्यांना त्यांच्या राष्ट्रात नेण्यासाठी नंतर विमान पुढच्या प्रवासासाठी उड्डाण घेणार अशी माहीती सूत्रांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या