पणजी : दीड महिन्यापूर्वी राज्यातील फक्त 30 गावांमध्ये कोविडग्रस्त आढळून आले होते. पावसाने जोर धरल्यानंतर आता 55 गावांमध्ये कोविडग्रस्त आढळून येत आहेत. काही गावांमध्ये सुरूवातीला एकच कोविडग्रस्त आढळून येतो. नंतर संख्या वाढत जाते. काही गावांमध्ये वीस ते तीस कोविडग्रस्त आहेत.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा मतदारसंघ असलेल्या साखळीत कोविडग्रस्तांची संख्या अगोदर 44 र्पयत पोहचली होती. मात्र अनेक कोविडग्रस्त अलिकडे आजारातून बरे झाले. यामुळे तिथे आता संख्या 25 र्पयत खाली आली आहे. बाणावलीत पूर्वी एकही कोविडग्रस्त नव्हता. तिथे आता तीन कोविडग्रस्त आहेत. एका मांगोरहीलमध्ये अजून 77 हून जास्त कोविडग्रस्त आहेत. लोटलीत पंचवीस आहेत. फोंडय़ात चाळीस, राय येथे तीन, काणकोणला सात, कुडकाला पाच, वेरें येथे दोन, नेवरा येथे सहा अशा प्रकारे कोविडग्रस्तांची संख्या आहे.जुवारीनगरला दीडशेर्पयत कोविडग्रस्तांची संख्या पोहचली. प्रारंभी तिथे फक्त दोन-तीनच कोविडग्रस्त आढळले होते. सडा, कुडतरी, बाळ्ळी, चिंबल, खारेवाडा, बायणा, नवेवाडे, मांगोरहील हे सगळे कोविडचे हॉटस्पॉट ठरले. बायणा येथे कोविडग्रस्तांची संख्या शंभर्पयत पोहचेल असे कुणालाच अगोदर वाटले नव्हते. तिथे शंभरहून जास्त कोविडग्रस्तांची नोंद झाली. केपे, इंदिरानगर- तिसवाडी येथेही कोविडग्रस्त आढळले. वेर्णाच्या तुलिप डायगनोस्टीक्स या उद्योगामुळे अगदी बार्देश तालुक्यार्पयत कोविडग्रस्तांची नोंद झाली.कोलवाळ, कोलवा, बेतालभाटी, कुजिरा, थिवी, म्हादरेळ, नुवें, गिरी, कुंडई, कामुर्ली, फातोर्डा आदी ठिकाणी प्रत्येकी एक किंवा दोन कोविडग्रस्त आढळले. वाळपई व परिसरात मात्र संख्या वीसपेक्षा जास्त झाली. अशा प्रकारे सध्या 55 ठिकाणी कोविडग्रस्त आढळल्याची नोंद आहे. पेडणो तालुक्यातही तीन ठिकाणी आढळले. शिरोडा, उसगाव, गोवा वेल्हा, पर्वरी येथेही यापूर्वी कोविडग्रस्त आढळले. धारबांदोडा, कुंकळ्ळी, कुडचडे, मडगाव आदी ठिकाणीही कोविडग्रस्तांची नोंद झाली.
CoronaVirus News: कोरोनाचा वाढता विळखा; गोव्यात 55 गावांमध्ये कोविडग्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 8:01 PM