पणजी : गोव्यात जे पाच रुग्ण कोरोनापासून मुक्त झाले त्या पाचहीजणांशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी फोनवरून व्यक्तीश: संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी त्यांची विचारपुस केली. यापुढे आणखी कुणालाही कोरोनाची लागण होऊ नये म्हणून जागृती करण्याच्या कामी आम्ही कोणतेही योगदान देण्यास तयार आहोत अशी इच्छा त्या पाचही व्यक्तींनी आपल्याकडे व्यक्त केल्याचे मुख्यमंत्र्यांनी येथे पत्रकारांना सांगितले.
गोव्यात कोरोनाचे एकूण सात पॉङिाटीव्ह रुग्ण सापडले होते. त्यापैकी पाचजण उपचारानंतर ठिक झाले. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या निगेटीव्ह आल्या. यामुळे त्यांना कोविद इस्पितळातून डिस्चाजर्ही देण्यात आला. आपण व्यक्तीश: त्या पाचशीजणांशी सोमवारी स्वतंत्रपणो बोललो. ते खूप सकारात्मक आहेत. कोरोना रुग्ण एकदा बरा झाल्यानंतर त्याच्यापासून इतरांना संसर्ग होत नाही. समाजाने त्यांच्यासोबत त्याबाबतीत कोणते मतभेद ठेवू नयेत. एकदा कोरोना झाला म्हणजे आयुष्यभर ती व्यक्ती कोरोनाबाधित असते असा समज कुणी करून घेऊ नयेअसेही मुख्यमंत्री म्हणाले.
अन्य राज्यांमध्ये जसे झोन करून राज्यांची विभागणी केली गेली आहे, तशी गोव्यात करण्याची गरज नाही पण कोरोना व्यक्ती ज्या भागात सापडल्या होत्या, त्या भागाचे आरोग्याच्यादृष्टीने आरेखन करण्यास मी संबंधित अधिका:यांना सांगितले आहे. आरोग्य सेतू अॅप सर्वानी डाऊनलोड करावा. त्याचा उपयोग भविष्यातही होईल. कोणत्या भागात कोरोना रुग्ण सापडला होता ते त्या अॅपद्वारे कळेल. कुणीही त्या भागात गेल्यानंतर अॅपवर तसे सिग्नल येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.