शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

coronavirus : गोव्याच्या इस्पितळात महिलेचा मृत्यू, सरकारला अहवालाची प्रतीक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 2:53 PM

68 वर्षीय महिलेला श्वासोच्छ्वासाचा त्रास होत होता. तिला सीओपिडी संसर्ग असल्याचे नंतर गोमेकाॅत आढळून आले.

पणजी - बांबोळीच्या गोमेकाॅ इस्पितळात उपचार घेणार्‍या 68 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेने गोव्याबाहेर प्रवास केला नव्हता. तिच्या वैद्यकीय चाचणी अहवालाची सरकारला प्रतिक्षा आहे. पुणेच्या प्रयोगशाळेतून अहवाल येईल. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी रविवारी ट्विट करून देखील  थोडी माहिती दिली आहे.68 वर्षीय महिलेला श्वासोच्छ्वासाचा त्रास होत होता. तिला सीओपिडी संसर्ग असल्याचे नंतर गोमेकाॅत आढळून आले. तिला गोमेकाॅच्या आयसोलेशन विभागात ठेवले गेले होते. तिला कोरोनाची लागण झाली की नाही याची वैद्यकीय चाचणी केली गेली. अहवाल प्रयोगशाळेतून अजून आलेला नाही. तो आल्यानंतरच पुढील स्थिती स्पष्ट होईल. आरोग्यमंत्री राणे म्हणाले की, तिचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही असे आपल्याला वाटते पण प्रयोग शाळेतून अहवाल येऊ द्या. तिचा मृत्यू करोनामुळे झाला असे म्हणता येत नाही.दरम्यान, गोव्यातील इस्पितळांमधून एकूण 56 व्यक्तींची चाचणी करुन नमुने प्रयोग शाळेत पाठवले आहेत. शुक्रवार व शनिवारी एकही अहवाल पुण्याहून गोव्यात आलेला नाही. गोवा सरकार स्वतः ची प्रयोगशाळा सुरु करण्याचा प्रयत्न करत आहे. दोन दिवसांपूर्वी प्रायोगिक तत्वावर प्रयोग शाळा सुरू झाली आहे. एकदा पूर्णपणे प्रयोग शाळा सुरू झाल्यानंतर मग गोव्यातच जलदगतीने कोरोनाविषयक चाचण्या होत राहतील. दिवसाला दोनशे चाचण्याही करता येतील असे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूgoaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्या