पणजी - कोरोनाचा पहिला रुग्ण गोव्यात सापडला असा दावा आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी त्यांना डॉक्टर एडवीन यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केला व लगेच सरकारने पाच मिनिटांत हा दावा मागे घेतला. डॉ. एडवीन यांना कोणी तरी बनावट फोन कॉल कथित प्रयोगशाळेमधून केला व रुग्णाविषयीचा अहवाल सकारात्मक असल्याचे सांगितले व त्यामुळे चुकीचा संदेश गेला, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.
गोव्यातील गोमेकॉ सरकारी रुग्णालयात कोरोनाचे एकूण चार संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. तीन जण विदेशी पर्यटक आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तथापि, त्यांच्याविषयीचे चाचणी अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेमधून अजून आलेले नाही. गोमेकॉचे डॉक्टर्स रोज पुण्याच्या प्रयोगशाळेच्या संपर्कात असतात. गेल्या 28 रोजी नॉव्रेजीयन संशयित गोव्यात आला होता. त्याने तत्पूर्वी दिल्लीला व नॉर्थ इस्टला भेट दिली होती. गोमेकॉचे डॉक्टर एडवीन यांना कुणी तरी फोन केला व प्रयोगशाळेतून बोलत असल्याचे सांगितले व या रुग्णाविषयीचा अहवाल सकारात्मक असल्याचे नमूद केले. त्यामुळे गोमेकॉच्या डॉक्टरांनी आरोग्य मंत्री राणे यांना माहिती दिली.
राणे यांनी लगेच ही माहिती सर्व पत्रकारांना दिली व आम्ही गोमेकॉ रुग्णालयात रुग्णाची सगळी काळजी घेत असल्याचे सांगितले. मंत्री राणे यांच्या सूचनेवरून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. त्यावर राणे यांनी रेकॉर्ड केलेले आपले स्टेटमेन्ट टाकले व गोव्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याचे जाहीर केले. यामुळे खळबळ उडाली व गोव्यातील सर्वच प्रमुख वृत्त वाहिन्यांनी पहिला कोरोना रुग्ण गोव्यात सापडला असे ब्रेकिंग वृत्त देण्यास आरंभ केला. मात्र लोकमतने बातमीची खातरजमा करून घेण्यासाठी मंत्री राणे यांना फोन केला असता, ती माहिती चुकीची असल्याचे राणे यांनी जाहीर केले. गोव्यात कोरोनाचा रुग्ण सापडला अशी बनावट माहिती डॉक्टर एडवीन यांना दिली गेली होती, असे राणे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : उत्तर कोरियात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, किम जोंग उन यांचा अजब दावा
Coronavirus: बापरे! ...तर कोरोनामुळे अमेरिका, ब्रिटनमध्ये 27 लाख लोकांचा मृत्यू होणार?
Coronavirus : ...म्हणून गायीच्या दुधापेक्षा गोमूत्र, शेणाला मिळतोय इतका भाव
Coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढला! देशातील रुग्णांची संख्या 147
Coronavirus: एकूण 4 टप्पे! भारतात कोणत्या टप्प्यात आहे 'कोरोना'?, जाणून घ्या