पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जनतेसाठी सकाळीच संदेश देताना घरातूनच काम करण्याचे कळकळीचे आवाहन केले. मुख्यमंत्री म्हणाले की, मीसुद्धा माझ्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्यास सांगितले आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थितीवर मी लक्ष ठेवून आहे आणि आढावा घेत आहे. हद्दीवरील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे तसेच आरोग्य सेवेवरही आम्ही नजर ठेवून आहोत. जनता कर्फ्यूच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर मला कुटुंबातील सदस्यांना वेळ द्यायला मिळाला. लोकांनीही घरात राहून कुटुंबातील व्यक्तींसोबतच वेळ घालवावा. कोरोना व्हायरसविरूध्द आम्ही एकत्रितपणे लढू असे, आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.