पणजी - कोविडची लागण झाली तरी, जर ताप किंवा तत्सम लक्षणो नसतील तर घरीच राहणो योग्य असा विचार करून राज्यातील एकूण सुमारे आठ हजार कोविडग्रस्त सध्या घरीच राहणो पसंत करत आहेत. काढा पिणो व अन्य उपाययोजना अशा रुग्णांकडून केली जाते. रोज सरासरी तीनशे कोविडग्रस्त घरी राहण्यासाठी शासकीय यंत्रणोकडून परवानगी मिळवत आहेत. सहसा परवानगी नाकारली जात नाही. काहीवेळा परवानगी उशिरा मिळते, असाही अनुभव कोविडग्रस्त सांगतात.घरी राहणा-या कोविडग्रस्तांची एकूण संख्या सोमवारपर्यंत 7 हजार 680 होती. मंगळवारी ही संख्या आठ हजार झाली आहे. सोमवारी 359 कोविडग्रस्त व्यक्तींनी घरी राहणो पसंत केले. रविवारी 212 व्यक्तींनी होम आयसोलेशन स्वीकारले. 5 सप्टेंबर रोजी 405 कोविडग्रस्त घरी राहिले. 4 रोजी 270 कोविडग्रस्तांनी होम आयसोलेशन स्वीकारले. 3 रोजी 449 कोविडग्रस्तांना घरी राहण्यास परवानगी मिळाली. अशा कोविडग्रस्तांची एकूण संख्या 3 र्पयत 6 हजार 434 होती.कोविड निगा केंद्रात जाऊन राहणे आता कोविडग्रस्तांना आवडत नाही. जर शरीराला काही त्रास होऊ लागला तरच काहीजण कोविड निगा केंद्रात जातात किंवा इस्पितळात उपचारांसाठी जातात. जर दिवसाला एकूण पाचशे कोविडग्रस्त आढळले तर त्यापैकी साडेतीनशे तरी होम आयसोलेशन स्वीकारतात. जर चारशे कोविडग्रस्त आढळले तर त्यापैकी सव्वा दोनशे तरी होम आयसोलेशन स्वीकारतात अशा प्रकारचा सर्वसाधारण निष्कर्ष आरोग्य खात्याच्या बुलेटिनमधील आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर काढता येतो.दरम्यान, आरोग्य खात्याने गेल्या काही दिवसांत कोविड चाचण्यांची संख्याच कमी केल्याने कोविडग्रस्त कमी संख्येने आढळू लागले आहेत. ज्या दिवशी सहाशे व सातशे कोविडग्रस्त आढळले होते तेव्हा दोन ते अडिच हजारांच्या चाचण्या केल्या गेल्या होत्या. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांत प्रत्येकी अकराशे ते बाराशे एवढय़ाच कोविड चाचण्या करण्यात आल्या. कोविडग्रस्तांची संख्या कमी दिसावी म्हणून चाचण्या कमी करणे योग्य नव्हे असे खासगी क्षेत्रातील काही डॉक्टरांना वाटते. काही लोक सध्या कोणतीच कोविड लक्षणे दिसत नसतील तर चाचणी करून घेत नाहीत. घरात एखादा कोविडग्रस्त आढळला तरी, त्या घरातील अन्य सदस्य स्वत:हून चाचणी करून घेण्यास येत नाहीत. ताप वगैरे आला तर मग कोविड चाचणी करूया अशी भूमिका घेतली जाते.रुग्णांनी ताप आल्यानंतर तीन दिवसांच्या आत इस्पितळात येऊन उपचार सुरू करणो गरजेचे असते. ज्यांना अन्य आजार असतात, त्यांनी तर कोविडची बाधा होताच व ताप आल्याचे दिसून येताच तीन दिवसांच्या आत उपचार सुरू करायलाच हवेत असे गोमेकॉच्या डॉक्टरांचेही म्हणणो आहे. आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांच्या मते गेल्या काही दिवसांत अनेक बळी हे रुग्ण ऐनवेळी इस्पितळात आल्याने झाले आहेत. आठ दिवस अंगावर ताप काढल्यानंतर मग श्वास घेण्यास त्रस होऊ लागताच अनेकजण इस्पितळात धाव घेतात व त्यामुळे काहीजण चोवीस तासांतही इस्पितळात मरण पावतात असे राणो यांचे म्हणणो आहे.
coronavirus: गोव्यात आठ हजार कोरोनाग्रस्तांचे घरीच आयसोलेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 12:24 PM