पणजी : कदंब महामंडळाने महाराष्ट्र, कर्नाटकडे जाणाऱ्या सर्व आंतरराज्य बसगाड्या ३१ मार्चपर्यंत रद्द केल्या आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर महामंडळाने हे पाऊल उचलले आहे, अशी माहिती कदंब महामंडळाचे वाहतूक सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी दिली. आंतरराज्य मार्गावर कदंबच्या रोज ९४ बसगाड्या धावतात. मालवण, कोल्हापूर, मिरज तसेच बेळगाव हुबळी आदी लांबपल्ल्याच्या गाड्या सकाळी सुटू शकल्या नाहीत. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठीचा आरक्षण कक्ष सकाळी बंद होता.
पणजीहून काही गाड्या केवळ सावंतवाडीपर्यंत गेल्या. फलाटावर केवळ सावंतवाडीपर्यंत जाणाऱ्या गाड्या लावल्या जात होत्या. बसस्थानकावर तुरळक प्रवासी दिसत असून लांब पल्ल्याचे प्रवासी मिळेल ती गाडी धरून जात आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या काल रात्री वस्तीला आलेल्या गाड्या मात्र सकाळी वेळापत्रकाप्रमाणे सुटल्या आंतरराज्य प्रवाशांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. बसस्थानकावर शुकशुकाट दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus: ...तर कोरोना विषाणू जास्त काळ टिकणार नाही; राजेश टोपेंची मोलाची सूचना
Coronavirus : कोरोना व्हायरसमुळे Apple ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Coronavirus : 5G टेक्नॉलॉजी कोरोना व्हायरस नष्ट करणार,चीनचा दावा
Coronavirus : जगभरात कोरोना अलर्ट! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?
‘...मग कोरोना व्हायरस गिळून ढेकर दिली असती की ईडीमागे लावून बोलती बंद केली असती?’
MP Crisis: ‘हे’ ट्विट सांभाळून ठेवा! सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या या दाव्याने पुन्हा खळबळ
Coronavirus : कोरोना नियंत्रणासाठी राज्यात युद्धपातळीवर प्रयत्न