पणजी : राज्यात अजून लॉक डाऊन कायम आहे आणि कलम 144 ही लागू आहे पण उत्तर गोव्याच्या वागातोर भागात वजरान किनाऱ्यावर विदेशी व्यक्तींची मोठी गर्दी होत आहे. तिथे शेकडो विदेशी अगदी बेधुंदपणो समुद्रस्नानाचा आनंद लुटत आहेत. सोशल डिस्टनसींगचे तीन तेरा वाजले आहेत. शिवाय काही श्ॉकही तिथे खुले असून त्या शॉकमध्ये विदेशींच्या जेवणाखाण्याची व्यवस्था होत आहे. याविषयीची छायाचित्रेही सोशल मिडियावर उपलब्ध झाली आहेत.जमाव बंदीचा आदेश दि. 17 मेर्पयत कायम ठेवून सरकारने गोमंतकीयांच्या एकत्रिकरणावर र्निबध घातले आहेत. लॉक डाऊनच्या काळात गोमंतकीयांना कोरोनापासून दूर राहण्यासाठी सगळी काळजी घ्यावी लागते. मात्र जे विदेशी व्यक्ती सध्या गोव्यात आहेत, ते मस्तपैकी समुद्रस्नान व अन्य प्रकारे पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. गोवा सरकारचे प्रशासन झोपल्यासारखी स्थिती आहे. वजरान- वागातोर येथे शेकडो विदेशी पर्यटक तोंडाला मास्क देखील न बांधता एकत्र येतात आणि कोणतेही सोशल डिस्टनसींग न पाळता समुद्रस्नान करतात. याविषयीची छायाचित्रेही उपलब्ध झाली आहेत.
सहा हजारपेक्षा जास्त विदेशी नागरिकांना सरकारने गोव्याहून परत पाठवले आहे. मात्र हजार ते बाराशे विदेशी पर्यटक अजून गोव्यात आहेत. ते काही गेस्ट हाऊसमध्ये वगैरे राहतात. त्यांच्यादृष्टीने गोव्यात लॉक डाऊनही नाही व गोव्यात पर्यटनही फुलले आहे. वजरान- वागातोर येथे खूप मोठय़ा संख्येने येणा:या पर्यटकांसाठी श्ॉक कसे काय खुले राहू शकतात असाही प्रश्न अन्य भागात बंद झालेल्या श्ॉकच्या मालकांना पडला आहे. एरव्ही गोव्यात रेस्टॉरंट्स, हॉटेल्स वगैरे बंद आहेत पण श्ॉकमध्ये मद्य, खाद्य सगळे विदेशी पर्यटकांना पुरविले जात आहे.
महत्वाच्या बातम्या...
SBI कडून लॉकडाऊनमध्ये मोठा दिलासा; कर्जाच्या व्याजदरात कपात
पाकव्याप्त काश्मीरमध्ये काहीतरी मोठे घडणार?; भारतीय हवामान विभागाचा इशारा
रहस्यमय...! भारतातील शेवटचे गाव; जिथे आजही महाभारतातील पूल अस्तित्वात
कल्याणमध्ये ऑनलाईन फूड डिलिव्हरी बॉयला कोरोना; आज २० रुग्ण सापडले