पणजी - गोव्यात शनिवारी कोरोनाचा दहावा बळी गेला आहे. मडगावच्या कोविड रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार घेणार्या 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. दक्षिण गोव्यातील मांगोरहील व वास्को हा भाग कोरोनाचे मोठे केंद्र झाला आहे. गेले 40 दिवस मांगोरहीलला कंटेनमेन्ट झोन आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण दहापैकी पाच व्यक्ती या वास्को व परिसरातील आहेत. यापूर्वी तेथील नगरसेवक पाश्कोल डिसोझा याचाही कोरोनामुळे बळी गेला. गोव्यात दोन हजारहून जास्त कोरोनाग्रस्त आहेत व यापैकी सुमारे 850 सक्रिय रुग्ण आहेत. एकूण 42 गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यापुढे कोरोडचा फैलाव रोखण्यासाठी लष्कराचीही मदत घेण्याचे सरकारने ठरवले आहे.