- सदगुरू पाटीलपणजी : आम्हाला दुबईमध्ये आता नोकरीच राहिलेली नाही, आम्ही गोव्यात येऊ पाहत आहोत पण आम्हाला सरकारकडून प्रतिसाद मिळत नाही अशा प्रकारचा आक्रोश विदेशातील शेकडो गोमंतकीय सध्या करत आहेत.केवळ दक्षिण गोव्यातीलच बांधव विदेशात अडकलेत असा विषय नाही तर उत्तर गोव्यातीलही अनेक हिंदू आखाती देशांमध्ये अडकले आहेत. अशावेळी केंद्र सरकारने व गोवा सरकारने आपल्याला मदत करावी असे या गोमंतकीयांना वाटते.जगातील सुमारे ६५ देशांमध्ये गोमंतकीय आहेत, जे गोव्यात परतू पाहत आहेत. युरोपमध्ये हजारो गोमंतकीय आहेत, ज्यांना गोव्यात परतण्याचे वेध लागले आहेत. त्यांनी गोवा सरकारच्या एनआरआय विभागाकडे नावांची नोंदणी केली आहे. कमर्शिअल विमाने सुरू करा, आम्ही तिकीट काढतो व येतो अशा प्रकारचे संदेश हे गोमंतकीय गोव्यातील सरकारी अधिका:यांना पाठवत आहेत.मात्र केंद्रीय गृह मंत्रलय जोर्पयत निर्णय घेत नाही व एसओपी ठरवत नाही, तोर्पयत आम्ही काही निर्णय घेऊ शकत नाही असे गोवा सरकारच्या एनआरआय विभागाशी निगडीत अधिकारी विदेशस्थित गोमंतकीयांना सांगत आहेत.
CoronaVirus News : विदेशात अडकलेल्या गोमंतकीयांचा आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 2:25 AM