पणजी - गोव्यात कोविडग्रस्तांची संख्या ज्या पद्धतीने वाढत आहे, ते पाहता सध्याच्या महिना अखेर्पयत एकूण संख्या 32 हजारार्पयत पोहचणार आहे हे स्पष्ट होत आहे. आतापर्यंत 27 हजार गोमंतकीयांना कोविडची बाधा झाली, या महिन्याच्या दि. 30 र्पयत 32 हजार लोकांना कोविडची बाधा झालेली असेल असा निष्कर्ष आकडेवारीवरून काढता येतो. 27 हजारांपैकी 21 हजार गोमंतकीय कोविडच्या आजारातून ठीक झाले आहेत.राज्यात कोविडच्या आजारातून ठीक होणा-या लोकांचे प्रमाण 77.82 टक्के असे आहे. सहा हजारच्या आसपास सक्रिय रुग्ण गोव्यात आहेत. रोज सहाशे नवे कोविडग्रस्त आढळत आहेत. कधी साडेसहाशेही आढळतात. यावरून सप्टेंबर अखेर्पयत कोविडग्रस्तांची एकूण संख्या 32 हजार असेल हे स्पष्ट होत आहे. दि. 14 सप्टेंबरपर्यंत राज्यात एकूण 24 हजार 898 लोकांना कोविडची बाधा झाली होती व त्यावेळी कोविडवर मात करण्यात यशस्वी झालेल्या लोकांची संख्या 19 हजार 648 होती. त्यादिवशी राज्यभरातील सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजार 946 होती. दोन दिवसांत ही संख्या वाढली व 16 सप्टेंबर रोजी एकूण कोविडग्रस्तांची संख्या 26 हजार 139 झाली. त्या दिवशी 628 नवे कोविडग्रस्त आढळले होते. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 15 सप्टेंबर रोजी कोविडग्रस्तांची एकूण संख्या 25 हजार 511 होती. 2क् हजार 94 लोक कोविडमधून ठीक झाले होते. 15 रोजी कोविडने अकराजणांचा मृत्यू झाला होता.नव्या 6 हजार लोकांना बाधा होणार दर चोवीस तासांत चारशे कोविडग्रस्त आजारावर मात करण्यात यशस्वी होत आहे. एवढ्य़ा लोकांना कोविड निगा केंद्रातून व इस्पितळातून डिस्चार्ज मिळतो. रोज सरासरी सव्वाचारशे कोविडग्रस्त होम आयसोलेशन स्वीकारतात. दि. 14 ते दि. 17 सप्टेंबर या चार दिवसांत राज्यात नवे 2 हजार 191 कोविडग्रस्त आढळले. एकंदरीत दर चार दिवसांनी सरासरी दोन हजार दोनशे नव्या लोकांना कोविडची बाधा होते. दर चोवीस तासांत पाचशे ते सहाशे कोविडग्रस्त आढळतात. त्यामुळेच गोव्यात अल्पावधीत एकूण पंचवीस हजारांहून जास्त लोकांना कोविडची बाधा झाली. या महिन्याचे आणखी बारा दिवस शिल्लक असून या बारा दिवसांत अंदाजे पाच ते सहा हजार नव्या लोकांना कोविडची बाधा होणार आहे हे आरोग्य खात्याच्या बुलेटिनमधील आकडेवारी अभ्यासल्यास कळून येते.सात शहरी भागांत 2 हजार रुग्ण राज्यातील सात शहरी भागांतील रुग्णालयांच्या क्षेत्रत एकूण दोन हजार शंभर सक्रिय कोविड रुग्ण आहेत. एका साखळी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात कोविडग्रस्तांची संख्या चारशेहून अधिक झाली आहे. मडगाव रुग्णालयाच्या क्षेत्रतही चारशेहून अधिक कोविडग्रस्त आहेत. मडगाव हा पूर्णपणे शहरी भाग आहे. साखळीचे तसे नाही. साखळी हे मिनी शहर असून तेथील रुग्णालयाच्या क्षेत्रात बहुतांश ग्रामीण भाग येतो पण तिथे कोविडग्रस्तांची संख्या मडगावच्याच बरोबरीची आहे ही चिंताजनक गोष्ट आहे. फोंड्य़ाला तीनशे तर पर्वरी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातही तीनशेहून अधिक कोविडग्रस्त आहेत. पर्वरी हे पणजीपासून जवळ असलेले उपनगर आहे तर फोंडा हे शहर आहे. तथापि, दोन्हीकडे कोविडबाधितांची संख्या समान झाली आहे. म्हापसा येथे दोनशे तर पणजीला साडेतीनशे कोविडग्रस्त आहेत. वास्कोला कोविडग्रस्तांची संख्या पुन्हा थोडी वाढली व साडेतीनशे झाली आहे.
coronavirus: गोव्यात या महिनाअखेर कोरोनाबाधितांची संख्या पोहोचणार 32 हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 1:37 PM