शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

Coronavirus : गोव्यामध्ये कोरोनामुळे शिमगोत्सव टाळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 6:45 AM

शिमगोत्सवाची मोठी परंपरा गोव्याला आहे. राजधानी पणजीत शिमगोत्सव मिरवणूक पार पडली पण मुरगाव, काणकोण अशा काही तालुक्यांतील लोकांनी शिमगोत्सव नको अशी भूमिका घेतली.

पणजी : कोरोना विषाणूचा एकही रुग्ण गोव्यात सापडलेला नसला, तरी अनेक संशयितांवर अधूनमधून उपचार केले जात असल्याने गोव्यात कोरोनाची धास्ती वाढली आहे. परिणामी गोव्यात प्रथमच काही शहरांतील यंदा लोकांनी व संबंधित समित्यांनी शिमगोत्सव बंद केले आहेत.शिमगोत्सवाची मोठी परंपरा गोव्याला आहे. राजधानी पणजीत शिमगोत्सव मिरवणूक पार पडली पण मुरगाव, काणकोण अशा काही तालुक्यांतील लोकांनी शिमगोत्सव नको अशी भूमिका घेतली. नेटिझन्सनी सोशल मीडियावरून याबाबत काणकोण व मुरगावच्या लोकांचे कौतुक केले आहे.आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या मते, अन्य शहरांतीलही शिमगोत्सव यावर्षी बंद व्हायला हवेत. कोरोनाचा संसर्ग कुणाला होऊ नये म्हणून प्रत्येक गोमंतकीयांनी काळजी घ्यायला हवी.पर्यटकही शिमगोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये भाग घेत असतात. यामुळे कुणीच धोका पत्करू नये. शिमगोत्सव दरवर्षी येत असतो. दरवर्षी शिमगोत्सव साजरा करण्याची संधी मिळत असते. यंदा शिमगोत्सव मिरवणूक बंद झाली म्हणून काही बिघडणार नाही, असे मंत्री राणे म्हणाले.लोकांनीच ठरवावेमुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मात्र थोडी वेगळी भूमिका घेतली आहे. शिमगोत्सव बंद करावा, असा आदेश सरकार देणार नाही. पण संबंधित आयोजन समित्यांनी त्या विषयी निर्णय घ्यावा. शिमगोत्सवच नव्हे, तर अन्य कोणतेच मोठे सोहळे तूर्त आयोजित न करणे योग्य ठरेल. मोठ्या सभा व बैठकाही आयोजित न करणे योग्य ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.विरोधकांची टीकामुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर विरोधकांनी टीका चालविली आहे. गोव्यात सध्या जिल्हा पंचायत निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांनिमित्ताने मुख्यमंत्री सावंत आणि त्यांच्या भाजपकडून मोठ्या प्रमाणात प्रचार सभा घेतल्या जात आहेत. वातानुकूलित यंत्रणा असलेल्या सभागृहांतही मोठ्या सभा घेतल्या जात असून त्याला शेकडो लोक उपस्थित राहत आहेत. मग मुख्यमंत्री कोरोनाच्या धास्तीपोटी सभा घेऊ नका, असा सल्ला विरोधकांना कसा काय देऊ शकतात, असा प्रश्न गोवा फॉरवर्डसह अन्य काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :goaगोवा