लोकमत न्यूज नेटवर्क, पणजीः गोवा शालान्त मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला असून यंदा सरासरी ९५.४६ टक्के निकाल लागला आहे. मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेटये यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी मंडळाचे सचिव विद्यादत्त नाईक, उपसचिव भारत चोपडे, सहाय्यक सचिव शीतल कदम उपस्थित होते.
बारावी परीक्षेत विज्ञान शाखेचा निकाल ९६.१० टक्के लागला असून वाणिज्य शाखेचा निकाल सर्वाधिक ९६.५२ टक्के लागला आहे. कला शाखेचा निकाल ९५.१६ टक्के असून व्यावसायिक विभागाचा निकाल ९२.७५ टक्के लागला आहे. यंदाही मुलींनी निकालाच्या बाबतीत माजी मारताना परंपरा कायम ठेवली आहे. चारही विभागात मिळून एकूण १९,८०२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात ९,९३० मुले तर ९,८७२ मुली होत्या. यापैकी ९५.०३ टक्के मुले तर ९५.८८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
ग्रामीण विद्यार्थ्यांचा डंका
बारावीच्या परीक्षेत ग्रामीण विद्यार्थ्यांची कामगिरी ही नजरेत भरणारी आहे. सत्तरी तालुक्याचा (८२.९८टक्के) अपवाद वगळता सर्व ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालयांनी शहरातील विद्यालयांपेक्षा सरस कामगिरी बजावली आहे. सांगे तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९८.६३ टक्के इतका लागला आहे. काणकोण तालुक्यात ९७.५७ टक्के, बार्दशात ९७.१९ टक्के निकाल लागला आहे. पेडणेत ९५.५१ टक्के निकाल लागला आहे. शहरी भागांत सर्वाधिक निकाल तिसवाडीत २७.८३ टक्के इतका लागला आहे.
मुलीच सरस
यंदाही मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी बजावताना उत्तीर्ण टक्केवारी ९५.८८ इतकी लावली. मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ९५.०३ आहे.
मने जिंकली.....
२०२१ मध्ये कोविड महामारीमुळे दहावीच्या परीक्षाच होऊ शकल्या नव्हत्या. अंतर्गत मूल्यांकनाद्वारे ही मुले उत्तीर्ण झाली होती. कोविडमुळे उत्तीर्ण झाले, म्हणून अनेक लोक त्यांची थट्टा करीत होते. आज बारावीचा निकाल लागला तो त्याच बॅचचा ५ वर्षातील सर्वाधिक निकाल लावून या बँचने थट्टा करणायांची तोंडे बंद केली.
दोन टर्ममध्ये परीक्षा
कोरोना महामारीच्या काळात सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा या दोन टर्ममध्ये घेण्यात आल्या होत्या. गोवा शालान्त मंडळानेही त्याच धर्तीवर २ सत्रात परीक्षा घेतल्या होत्या. दोन्ही सत्रातील गुण एकत्र करून निकाल जाहीर करण्यात आला आहे.
१० हजार विद्यार्थ्यांना ६०-८० % गुण
इयत्ता दहावीत परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्यात आलेली कोविडची बॅच म्हणून थट्टा करणाऱ्यांना चपराक देताना आणखी एक महत्त्वपूर्ण कामगिरी या बेंचने केली आहे. या बॅचचे १०,२९९ विद्यार्थी म्हणजेच ५० टवण्याहून अधिक विद्याथ्र्यांनी ६० ते ८० टक्के गुण मिळविले आहेत.
फोटोकॉपी अर्ज १३ पर्यंत
उत्तरपत्रिकाच्या फोटो कॉपी मागणारे विद्यार्थी ते १३ मे पर्यंत मागू शकतात. प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकेला ३५० रुपये आकारले जाणार आहेत. फेरमूल्यांकनासाठी ७०० रुपये शुल्क असून २८ मे त्यासाठी अंतिम तारीख आहे. अॅक्सेन्सिया पद्धतीने व्हेरिफिकेशनसाठी दर विषयाला १०० रुपये शुल्क असून त्यासाठी १८ मेपर्यंत मुदत आहे