शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

CRZ अधिसूचना बड्या बिल्डरांच्या हितासाठी : काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 8:02 PM

केंद्र सरकारने मंजूर करून जारी केलेली सीआरझेड अधिसूचना ही गोव्यातील किना-यांसाठी अत्यंत घातक ठरणार आहे.

पणजी : केंद्र सरकारने मंजूर करून जारी केलेली सीआरझेड अधिसूचना ही गोव्यातील किना-यांसाठी अत्यंत घातक ठरणार आहे. गोव्यातील छोटे मच्छीमार, रापोणकार यामुळे संकटात येतील. मोठ्या बिल्डरांना व गर्भश्रीमंत उद्योजकांना गोव्याचे सागरकिनारे खुले करून त्या किना-यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसने केली आहे.सोमवारी येथे काँग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी पत्रकार परिषद घेतली. गोव्याने अजून किनारपट्टीत व्यवस्थापन आराखडा तथा योजना तयार केलेली नाही. गोव्यात पन्नास मीटर हायटाईड लाईनही निश्चित केली गेलेली नाही. तरी देखील केंद्राने सीआरझेडची अधिसूचना जारी करून विकास प्रतिबंधक क्षेत्र तथा नो डेव्हलपमेंट झोन हा 200 मीटरवरून 50 मीटरवर आणला आहे. किनारपट्टी धनदांडग्यांच्या हाती देण्यासाठीचे हे मोठे कारस्थान आहे, असे पणजीकर म्हणाले.देशभरातील एक लाख लोकांनी सीआरझेडच्या मसुदा अधिसूचनेला आक्षेप घेतला होता. लेखी स्वरुपात आक्षेप नोंदविला होता. त्यात गोव्यातील एनजीओ, पारंपरिक मच्छीमार आदी होते, पण केंद्र सरकारने त्या आक्षेपांचा गंभीरपणे विचारच केला नाही. गोव्याला केंद्राची प्रस्तावित नवी सीआरझेड अधिसूचना लागू होणार नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गेल्यावर्षी विधानसभा अधिवेशनात सांगितले होते, गोव्याचा किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा तयार न झाल्याने गोव्याला ही अधिसूचना लागू होणार नाही, असे पर्रीकर यांचे म्हणणे होते. मात्र केंद्राने अधिसूचना जारी करताना ती गोव्याला लागू होणार नाही, असे म्हटलेले नाही. पर्रीकर यांनी व एकूणच गोवा सरकारने आता स्पष्टीकरण द्यावे, असे पणजीकर म्हणाले. गोव्याच्या सुंदर समुद्रकिना-यांचे काँक्रिटच्या जंगलामुळे विद्रुपीकरण होईल व पर्यटन व्यवसायाला त्याची मोठी ठोकर बसेल, असे पणजीकर म्हणाले.

टॅग्स :goaगोवा