पणजी - म्हापसा न्यायालयात उघडकीस आलेल्या लाचखोरी प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथकाने म्हापसा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुदिन सांगोडकर यांच्या निवासस्थानी झाडाझडती घेतल्यामुळे या प्रकरणातील संशयाची सुई चक्क त्या न्यायालयाच्या न्यायाधिशावरच रोखली गेली आहे. सांगोडकर यांना समन्स बजावून एसीबीकडून त्यांची ३ तास चौकशी करण्यात आली.
एसीबीने पकडलेली २०० रुपये ही लाचेची रक्कम थट्टेचा विषय वाटत असला तरी या प्रकरणाने प्रत्यक्ष न्यायसंस्थेच्या विश्वासहार्तेवरच बोट दाखविण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. म्हापसा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधीश संशयाच्या घेºयात आले आहेत. त्यांना एसीबीकडून समन्स बजावून त्यांची ३ तास चौकशी केलीच, शिवाय त्यांच्या घरावर छापा टाकून झडतीही घेतली आहे. काही महत्त्वाची कागदपत्रे आणि बँक संबंधी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. वाहतूक नियम भंगासाठी कमी रकमेची पावती फाडून अधिक रक्कम उकळणाºया शिपायाला शुक्रवारी म्हापसा न्यायालयाच्या डी न्यायालयात भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले होते. तीळू आरोसकर असे नाव असलेला हा शिपायी केवळ मध्यस्थ म्हणून ही लाचखोरी करत होता असे तपासातून आढळून आले होते. हे पैसे कुणाला जात होते याची माहितीही पोलिसांना तपासातून मिळाली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रंगेहाथ पकडल्यानंतर तिळूने ही माहिती एसीबीला दिली होती. परंतु याबाबत एसीबीकडून गुप्तता पाळण्यात येत होती. परंतु प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सांगोडकर यांना समन्स पाठविण्यात आल्यावर आणि त्याची एसीबीत चौकशी सुरू असतानाच त्याच्या निवासस्थानी झडती सुरू झाल्यावर या प्रकरणात धक्कादायक वस्तुस्थिती बाहेर पडण्याची श्क्यता निर्माण झाली आहे. सांगोडकर यांची चौकशी करून जबानी नोंदवून घेण्यात आल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली. गुरूवारी संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती, परंतु अटक करण्यात आली नव्हती. खाजगी वाहने पर्यटकांना भाड्याने देण्याच्या प्रकरणात ज्यांना पकडण्यात आले होते त्यांच्याकडून दंडाची रक्कम म्हणून साडेचार हजार रुपयापर्यंत घेतली जात होती आणि केवळ २००रुपयांची पावती फाडली जात होती. या प्रकरणात कुणी तरी एसीबीला माहिती दिल्यानंतर एसीबीच्या एसीबीने नियोजनबद्द सापळा रचून तिळू याला रंगेहाथ पकडले होते.