वास्को: गोव्याच्या दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कारवाई करूत विदेशातून आलेल्या एका प्रवाशाकडून ५७ लाख ७५ हजार रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले. शारजाहून दाबोळी विमानतळावर ‘एअर अरेबीया’ चे विमान उतरल्यानंतर त्या विमानातील प्रवाशांची तपासणी करताना कस्टम अधिकाऱ्यांना नवास नावाच्या एका प्रवाशावर हालचालीवरून संशय निर्माण झाला. कस्टम अधिकाऱ्यांनी लगेच त्याच्या सामानाची झडती घेतली असता त्यातून (चेकइन बेगेज मधून) त्यांना तस्करी करून आणलेली ११ सोन्याची बिस्कीटे आढळली.शुक्रवारी शारजाहून दाबोळीवर उतरलेल्या विमानातील प्रवाशांची कस्टम अधिकारी तपासणी करताना त्यांना नवास नावाच्या प्रवाशावर संशय निर्माण झाला. गोवा कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त वाय.बी.सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळावर उपस्थित कस्टम अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशाला बाजूला करून त्याच्या सामानाची झडती घेण्यास सुरुवात केली. झडती वेळी त्या प्रवाशाच्या सामानातून ११ सोन्याची बिस्कीटे आढळली असून त्यांचे एकूण वजन १ किलो २७६ ग्राम असल्याची माहिती कस्टम विभागाकडून देण्यात आली. त्या प्रवाशाने आणलेले सोने तस्करीचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी कारवाई करून ते जप्त केले.शारजाहून गोव्यात तस्करीचे सोने घेऊन आलेला तो प्रवाशी मूळ कासरकोड, केरळ येथील असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. शारजाहून गोव्यात आणण्यात आलेले हे ५७ लाख ७५ हजाराचे तस्करीचे सोने कुठे नेण्यात येणार होते, तसेच या प्रकरणात अन्य कोणाचा समावेश आहे काय याबाबत कस्टम अधिकारी अधिक तपास करीत आहेत.
पाच महिन्यांत जप्त करण्यात आले २.८९ कोटींचे सोनेयावर्षाच्या (२०२१ मध्ये) सुरुवातीपासून दाबोळी विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी कारवाई करत आतापर्यंत २ कोटी ८९ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केल्याची माहिती विभागाकडून प्राप्त झाली.