शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

"मराठी-कोंकणी एकत्र नांदणे मलाही मान्य", वादानंतर दामोदर मावजो यांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 9:46 AM

Damodar Mavjo News: ‘मराठी-कोंकणी पूर्वीपासूनच गोव्यात एकत्र नांदत आहेत. त्यांनी एकत्र नांदणे हे मलाही पूर्णपणे मान्य आहे. मराठी-कोंकणीत समन्वयाचीच भूमिका असायला हवी, पण कोंकणी ही मराठी भाषेची बोली असे म्हणून हिणवण्याची चूक मराठीवाद्यांनी करू नये,’ अशी भूमिका ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर ऊर्फ भाई मावजो यांनी मांडली.

 पणजी - ‘मराठी-कोंकणी पूर्वीपासूनच गोव्यात एकत्र नांदत आहेत. त्यांनी एकत्र नांदणे हे मलाही पूर्णपणे मान्य आहे. मराठी-कोंकणीत समन्वयाचीच भूमिका असायला हवी, पण कोंकणी ही मराठी भाषेची बोली असे म्हणून हिणवण्याची चूक मराठीवाद्यांनी करू नये,’ अशी भूमिका ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर ऊर्फ भाई मावजो यांनी मांडली.

मावजो यांनी काल, सोमवारी ‘लोकमत’च्या पणजी कार्यालयास भेट देऊन संवाद कार्यक्रमात भाग घेतला. गोव्यात सुरू झालेल्या तीव्र भाषावादाच्या पार्श्वभूमीवर ही विशेष मुलाखत घेण्यात आली. 

‘तुम्ही मराठीविरुद्ध बोलला होता का?’ असे मुलाखतीवेळी मावजो यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘मी मुळीच मराठीविरुद्ध बोललो नाही. मी कधीच बोलणार नाही. कोंकणीला एकदम जवळची भाषा ही मराठी आहे. माझी मातृभाषा कोंकणी आहे पण मी मराठी चांगली बोलतो व चांगली लिहितो. मी बालपणी शाळेत मराठी शिकलो. पोर्तुगीजही शिकलो. अलिकडे माझे अनेक चर्चात्मक कार्यक्रम महाराष्ट्रात झालेले आहेत.’ 

मला एका पत्रकाराने राजभाषा कायद्याविषयी विचारल्याने ‘मी फक्त कोंकणी हीच एकमेव राजभाषा आहे व तीच एकमेव राजभाषा असावी’, असे म्हटले होते. पण थोडे चुकीचे छापून आले. राजभाषा कायद्यात मराठी नको ही भूमिका आम्ही १९८७ साली मांडली होती, हेही खरे आहे पण राजभाषा कायदा अस्तित्वात आल्यानंतर मीही वाद सोडून दिला व साहित्य निर्मितीच्याच कामासाठी स्वत:ला वाहून घेतले’ असे मावजो म्हणाले. 

मावजो म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील मराठी लेखक व तेथील मराठी भाषिक माझा आज देखील पूर्ण आदर करतात. पण, गोव्यातील काही मराठीप्रेमींनी सध्याच्या वादात माझ्याविषयी चुकीचा समज करून घेतला, याबाबत मला वाईट वाटते. काही चांगले मराठीप्रेमी केवळ एका प्रतिक्रियेमुळे किंवा बातमीमुळे माझ्याविषयी चुकीचा समज करून बसले. काहीजण तर कोंकणी मराठीची बोली आहे, असे अन्यायकारक बोलून मोकळे झाले,’ असे मावजो म्हणाले.

मावजो म्हणाले की, ‘गोव्यात पोर्तुगीज काळापासून मराठीचा वापर केला जातो. एकेकाळी गोव्यातील हिंदू समाजाने धार्मिक व आध्यात्मिक कारणांसाठी मराठी भाषा स्वीकारली व ख्रिस्ती समाजाने पोर्तुगीज स्वीकारली होती. पण नंतर कोंकणीचा स्वीकार सर्वांनी केला. तरीदेखील आजसुद्धा बहुतांश हिंदू समाज त्यांची संस्कृती व धर्म व अध्यात्म यासाठी मराठीचाच वापर करतात. मी त्याविरुद्ध नाही. पण, केवळ त्यासाठी म्हणून ती राजभाषा ठरत नाही. जी भाषा बोलली जाते तीच राजभाषा. गोवा राजभाषा कायद्यात मराठीला राजभाषेचे स्थान नको, असे मी म्हणतोय. मराठीतून जर कुणी सरकारला पत्र पाठवले तर सरकारने मराठीतून उत्तर द्यावेच.

हिणवणे थांबवावे- ‘कोंकणी-मराठीने एकत्र नांदावे या मताचा मी आहे. केवळ गोव्यातच नव्हे तर देशातही एकत्र नांदावे. कोंकणी-मराठीत समन्वयाचीच भूमिका असावी पण ती एकतर्फी असू नये.- केवळ कोंकणीप्रेमीच समन्वयाची भूमिका घेतील व मराठीवादी मात्र कोंकणीला बोली म्हणूनच हिणवत राहतील तर ते गैर आहे. ते मात्र मला मान्य होणार नाही,’ असे मावजो म्हणाले.

अंमलबजावणीचा आग्रह अवमान नव्हेआपल्या मराठी संबंधीच्या वक्तव्यावरून वाद निर्माण होणे हे फार चुकीचे असल्याचे मावजो म्हणाले. ‘कोंकणी-मराठीचे असलेले जिव्हाळ्याचे नाते कायम टिकून राहावे, असे मला वाटते.  राजभाषा कायद्यानुसार एका राज्याच्या दोन भाषा असू शकत नाहीत. राजभाषा कायद्याची तंतोतंत अंमलबजावणीचा आग्रह धरणे म्हणजे मराठीचा अवमान नव्हे,’ असे ते म्हणाले.

मी ‘लोकमत’ नियमितपणे वाचतो- मी ‘लोकमत’ नियमितपणे वाचतो. भाषावादाबाबत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेला संदेश प्रभुदेसाय यांचाही कालचा लेख वाचला.- मी मराठीचा विरोधक नव्हे, कोंकणी माझी मातृभाषा आहे व आज मी ‘लोकमत’मध्ये बोलताना देखील शुद्ध मराठीतच बोलत आहे. - ‘मी कोंकणीतून चांगल्या प्रकारे साहित्य निर्मिती करू शकतो, कारण ती माझी मातृभाषा आहे. आजची मुले देवनागरी कोंकणी वाचतात हा माझा अनुभव आहे,’ असेही मावजो म्हणाले.

टॅग्स :goaगोवाmarathiमराठी