शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

‘दयानंद’चे १६ हजार बोगस लाभार्थी

By admin | Published: September 15, 2015 2:32 AM

पणजी : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थींची संख्या ९६ हजार ३२७ झाली आहे. सरकारने या योजनेअंतर्गत २ हजार ११५ कोटी रुपये ज्येष्ठ नागरिकांना वितरित केले.

पणजी : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थींची संख्या ९६ हजार ३२७ झाली आहे. सरकारने या योजनेअंतर्गत २ हजार ११५ कोटी रुपये ज्येष्ठ नागरिकांना वितरित केले. १६ हजार बोगस लाभार्थींची नावे वगळली असून त्यांच्याकडून १४ कोटी रुपये वसूल केले आहेत. २0१५-१६ हे वर्ष दयानंद सामाजिक सुरक्षा योजना वर्ष म्हणून साजरे केले जाईल. यानिमित्त येत्या २ आॅक्टोबर रोजी कला अकादमी संकुलात दुपारी ३ वाजता विशेष समारंभ आहे. प्रत्येक तालुक्यातील १0 मिळून एकूण १२0 प्रथम लाभार्थींना या वेळी समारंभात गौरविण्यात येणार आहे. समाजकल्याणमंत्री महादेव नाईक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, तसेच मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते हा गौरव होईल. २ आॅक्टोबर २00१ साली भाजपचेच सरकार असताना ही योजना सुरू झाली. ज्येष्ठ नागरिकांसह २८,७५५ एकट्या महिला, १0,४0६ अपंग, तसेच ११३ बेवारस मुले यांचा लाभ घेत आहेत. ज्येष्ठांना महिना २ हजार रुपये मानधन या योजनेंतर्गत दिले जाते. ४0 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असल्यास महिना २ हजार रुपये आणि ९0 टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असल्यास महिना ३५00 रुपये मानधन दिले जाते. बेवारस मुलांसाठीचे मासिक मानधन ७५0 रुपयांवरून २ हजार रुपयांपर्यंत वाढविले आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली. पती-पत्नी दोघेहीजण किंवा एकच व्यक्ती दोन ठिकाणी लाभ घेत असल्याचे आढळल्याने गेल्या वर्षी १६ हजार लाभार्थींची नावे वगळली आणि त्यांच्याकडून १४ कोटी रुपये वसूलही केले. सरकारी खात्यात नोकरी करत असतानाही या योजनेचा लाभ घेणाऱ्या १२५ जणांची नावे वगळली आणि त्यांच्याकडूनही वसुली केली. (प्रतिनिधी)