पणजी: रविवारी राज्यात पार पडलेल्या आर्यनमॅन ७०.३ या आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉनमध्ये भाग घेतलेल्या २६ वर्षीय कामख्या सिध्दार्थ याचे सोमवारी एका खासगी हॉस्पिटमध्ये मृत्यू झाला. याबाबतची माहीती उत्तर गोवा पोलिस अधिक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.
आर्यनमॅन स्पर्धा पूर्ण होत आली असताना कामख्या सिद्धार्थ हा दुपारी ३.३० च्या दरम्यान धावताना खाली कोसळला होता. यानंतर त्याला जवळच्या खासजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कामाख्य सिध्दार्थ याच्यावर उपचार सुरु होते. कामाख्य सिध्दार्थचे अनेक अवयव निकामी झाले होते. सोमवारी दुपारी १.३० च्या आसपास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी, माहिती समोर आली आहे.
कामाख्य सिद्धार्थ हा मूळ पटना, बिहार येथील राहीवासी होता. आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेण्यासाठी तो राज्यात दाखल झाला होता. त्याच्या मृत्यूची बातमी पालकाला देण्यात आली असून, लवकरच त्याचे पालक राज्यात दाखल होणार आहे, त्यानंतर इतर सर्व प्रक्रीया पूर्ण करत मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात येईल, अशी माहितीही निधीन वाल्सन यांनी दिली.