पणजी - मुंबई-गोवा जलमार्गावरील बोट सेवेचे प्रात्यक्षिक घेण्यात आले असून लवकरच प्रवाशांसाठी ही सेवा नियमित सुरु होणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि आंग्रीया सी इगल कंपनीने यासाठी हातमिळवणी केली आहे.
‘आंग्रीया’ ही बोट मुंबईहून बुधवारी निघाली ती काल सकाळी मुरगांव बंदरात पोचली. सी इगल क्रुझ सर्व्हिस कंपनी ही बोटसेवा देणार असून ती पर्यटकांचे आकर्षण ठरेल, अशी अपेक्षा आहे. ३५0 प्रवाशांच्या वाहतुकीची या बोटीची क्षमता आहे. सायंकाळी ५ वाजता मुंबईहून निघून दुसºया दिवशी सकाळी ९ वाजता गोव्यात पोचेल आणि सायंकाळी ५ वाजता मुरगांव बंदरातून निघून दुसºया दिवशी सकाळी ९ वाजता मुंबईला पोचेल. दर दिवसाआड ही बोटसेवा असेल.
एकेरी प्रवासाचे तिकिटभाडे ७,५00 रुपये असणार आहे. यात दुपारचे आणि रात्रीचे जेवण तसेच नाष्टा याचा समावेश असेल. ‘आंग्रीया’ देशातील ही पहिली स्थानिक क्रुझ सेवा ठरणार आहे. या महाकाय बोटीत स्विमिंग पूल, आठ रेस्टॉरण्टस, बार, २४ तास उघडे असलेले कॉफी शॉप असणार आहे. बोटीमधील रेस्टॉरण्ट विवाह समारंभासाठी किंवा बड्या कंपन्यांच्या कॉर्पोरेट बैठकांसाठीही उपलब्ध केले जाईल.
गोवा हे पर्यटनस्थळ म्हणून जगाच्या नकाशावर झळकत आहे. २0१७ साली पर्यटकसंख्येत २३ टक्क्यांनी वाढ झाली. या पार्श्वभूमीवर गोव्यात येणाºया पर्यटकांमध्ये ही बोट खास आकर्षण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.