नारायण गावस, पणजी गोवा: मुर्डी खांडेपार गावातील ग्रामस्थांनी गावात बांधू इच्छिणाऱ्या जलस्त्राेत खात्याच्या बंधाऱ्याला विरोध केल्याने सरकारने १४४ कलम लागू केले आहे. हा १४४ कलम मागे घ्यावा. तसेच गावात बंधारा बांधू नये यासाठी मुर्डी खांडेपार ग्रामस्थांनी आज पणजी आझाद मैदानावर निदर्शने केली. या अनुसुचित जमातीच्या लोकांना गाकुवेध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच गाेवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी या ग्रामस्थांना पाठींबा दिला. जोपर्यंत १४४ कलम मागे घेत नाही तोपर्यंत आझाद मैदानावरुन हटणार नसल्याचा निर्णय या ग्रामस्थांनी घेतला आहे.
खांडेपार नदीवर पावसाळ्यात पूर येत असतो. २०२१ साली या भागात मोठा पूर आला होता. यावेळी लाेकांचे मोठे नुकसान झाले पण सरकारने नुकसान भरपाई योग्य दिली नाही. या गावातील लोकांना या नदीवर मच्छिमारी भात शेतीचा व्यावसाय करतात. जर बंधारा बांधला तर हे पाणी लाेकांच्या घरात शिरणार भात शेतीचे नुकसान होणार आहे. आम्ही या बंधाऱ्याला अनेक वेळा विरोध केला आहे.. गाेवात बैठका घेतल्या आहे. सर्वजबाबदार अधिकारी मंत्र्यांना निवेदन दिले आहे. पण सरकार पोलीसांना आणून जबरदस्तीने हा प्रकल्प येथे आणत आहे, असे या गावातील ग्रामस्थांनी सांगितले.
१४४ कलम ताबडतोब काढा
हे सरकार सर्वसामान्य लोकांच्या विरोधात आहे. प्रत्येकवेळी हिंदू धर्म संकटात आहे असे मुख्यमंत्री तसेच भाजप सांगत आहे. आज या गावातील लोकांना चतुर्थीच्या काळात १४४ कलम लागू करून सण साजरा करण्यास अन्याय करत आहे. आता तुम्हाला हिंदू धर्म संकटात दिसत नाही. फक़्त राजकारण करण्यासाठी हिंदू संकटात दिसतो. या अनुसुचित जमातीचा लोकांवर प्रत्येकवेळी सरकारने अन्याय केला आहे. या गावातील लाेकांना हा बंधारा नको आहे तरीही जबरदस्तीने येथे बंधारा आणून लोकांवर अन्याय केला जात आहे .हे सरकार हुकुमशाहीचे आहे, असा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला.
जबरदस्तीने बंधारा
सरकारने अनुसुचित जमातीच्या लाेकांचे हक्क दाबत आहे. या लोकांना राजकीय आरक्षण दिले जात नाही. मोठमोठे प्रकल्प आणून गावातील लोकांच्या शेतजमिनीव अधिकार नष्ट करु पाहत आहे. खांडेपार गावात हा बंधारा बांधला तर गावातील लोकांना त्याचा त्रास होणार आहे. याचाा विचार सरकारने करावा, असे गाकूवेध संघटनेचे नेते रामा काणकाेणकर यांनी सांगितले.