शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

मुरगाव पालिकेच्या विविध हद्दीत 387 संशयित डेंग्यू रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 3:03 PM

मुरगाव नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या २५ प्रभागात या एका वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात संशयित डेंग्यूचे रुग्ण आढळले असून जानेवारी २०१८ ते अजूनपर्यंत ३८७ संशयित डेंग्यू  प्रकरणे सापडलेली असल्याची माहीती आरोग्य खात्याकडून उपलब्ध झाली आहे.

ठळक मुद्देमुरगाव पालिकेच्या विविध हद्दीत 387 संशयित डेंग्यू रुग्ण आढळले.आरोग्य केंद्र मुरगाव नगरपालिकेच्या हद्दीत डेंग्यू रोखण्यासाठी सर्व प्रकारची सतत पावले उचलत आहे. डेंग्यू आजारामुळे या वर्षात दोन अल्पवयीन मुलांचा दुर्देवी मृत्यू झाला

वास्को - मुरगाव नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या २५ प्रभागात या एका वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात संशयित डेंग्यूचे रुग्ण आढळले असून जानेवारी २०१८ ते अजूनपर्यंत ३८७ संशयित डेंग्यू  प्रकरणे सापडलेली असल्याची माहीती आरोग्य खात्याकडून उपलब्ध झाली आहे. आरोग्य केंद्र मुरगाव नगरपालिकेच्या हद्दीत डेंग्यू रोखण्यासाठी सर्व प्रकारची सतत पावले उचलत असली तरी नागरीकांना डेंग्यूपासून दूर राहण्यासाठी करण्यात येत असलेल्या सूचनांचे पालन अनेकांकडून करण्यात येत नसल्याने मागच्या एका वर्षात येथे डेंग्यू साथ वाढल्याचे वास्को आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. रश्मी खांडेपारकर यांनी सांगितले.

मुरगाव नगरपालिकेचे २५ प्रभाग म्हणजे सडा ते वाडेपर्यंतचा भाग असून या भागात सुमारे १ लाख १५ हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. चालू वर्षाच्या सुरुवातीपासून अजूनपर्यंत पालिका क्षेत्राताली सडा, बायणा, वास्को, नवेवाडे, वाडे, मंगोरहील, शांतीनगर अशा विविध भागातून अजून पर्यंत ३८७ संशयित डेंग्यूची प्रकरणे समोर आली आहेत. डेंग्यू आजारामुळे या वर्षात दोन अल्पवयीन मुलांचा दुर्देवी मृत्यू झाला असून यात चिखली भागातील एका मुलाचा व सडा भागातील एका मुलीचा समावेश आहे. मुरगाव नगरपालिकेच्या हद्दीत या वर्षी डेंग्यू साथ बऱ्याच प्रमाणात आढळल्याने याबाबत आरोग्य खाते काय पावले उचलत आहेत याची माहीती घेण्यासाठी डॉ. रश्मी यांना संपर्क केला असता आरोग्य खाते डेंग्यूवर रोख लावण्यासाठी सुरुवातीपासून सतत पावले उचलत असल्याचे सांगितले.

पालिका हद्दीत येत असलेल्या सर्व भागात आमच्या खात्याचे कर्मचारी सतत फिरून डासावर फवारे मारणे, ज्या घरात डेंग्यु रुग्ण आढळलेली आहेत तेथे पुन्हा पुन्हा जाऊन तपासणी करणे, पाणी भरून अनेक काळापासून उघडी ठेवलेली बॅरले खाली करण्याची सूचना लोकांना देणे अशी विविध पावले आरोग्य खाते उचलत असल्याची माहीती डॉ. रश्मी यांनी दिली. डेंग्यू वाढू नये यासाठी लोकांना पाण्याची बॅरले झाकून ठेवा अशा विविध सूचना करून सुद्धा अनेक जण त्याची अंमलबजावणी करत नसल्याचे आढळून आल्याचे डॉ. रश्मी यांनी माहीतीत पुढे सांगितले. सडा, नवेवाडे हे भाग डोंगरावर असल्याने येथे पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने मोठ्या प्रमाणात लोक येथे बॅरलात पाणी भरून ठेवत असल्याचे पाहणीच्या वेळी आढळून आल्याची माहीती रश्मी यांनी देऊन यापैंकी बहुतेक बॅरले खुली ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक विनंती करून सुद्धा पाण्याची बॅरले काही जण झाकत नसून यामुळे ह्या पाण्यात डेंग्यू डासांची लागवण होत असून अशी बॅरले खाली करण्यासाठी गेल्यास ते लोक आमच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावरही येत असल्याच्या घटना घडल्याची माहिती दिली. लोकांना पाण्याची समस्या आहे हे मान्य आहे, मात्र अनेकांकडून सावधगीरी बाळगण्यात येत नसल्याने मागच्या काळात डेंग्यूची साथ वाढल्याचे डॉ. रश्मी म्हणाल्या.

डेंग्यूवर आळा घालण्यासाठी आरोग्य खात्याबरोबरच नागरीकांनी विविध सुरक्षेची पावले उचलणे तेवढेच गरजेचे असल्याचे रश्मी यांनी माहितीत पुढे सांगितले. चालू वर्षात आढळलेल्या ३८७ संशयित डेंग्यु प्रकरणापैंकी १५ जणांना डेंग्यु झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती रश्मी यांनी दिली. २०१७ सालात पालिका हद्दीतील विविध भागातून ४३६ जणांना संशयित डेंग्यू  झाल्याचे उघड झाले असून यापैकी सुमारे २० जणांना डेंग्यू  झाल्याचे स्पष्ट झाले होते अशी माहीती रश्मी यांनी दिली. मागच्या वर्षापैक्षा यंदा डेंग्यूच्या संख्येत कपात झाली असून सतत डेंग्यूवर आळा आणण्यासाठी पावले उचलण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. डेंग्यूची लागवणीमुळे मृत्यू सुद्धा होऊ शकतो व हा आजार टाळण्यासाठी सर्वांनी छोट्या छोट्या सावधगिरी बाळगल्यास या आजारापासून प्रत्येकजण दूर राहू शकतात असे त्यांनी शेवटी सांगितले.चालू वर्षी मलेरियाची साथ ओसरली

डासामुळेच पसरणारी मलेरीयाच्या साथ २०१७ सालापेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची माहीती डॉ. रश्मी यांनी दिली. मागच्या वर्षी २०० हून अधिक मलेरीयाचे रुग्ण आढळले होते. यावर्षी नोव्हेंबर पर्यंत पालिका हद्दीतील विविध भागात मलेरियाचे ७० रुग्ण आढळले. मलेरीवावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य खाते सतत विविध पावले उचलते, असे रश्मी खांडेपारकर यांनी शेवटी माहीतीत सांगितले.

टॅग्स :dengueडेंग्यूgoaगोवाhospitalहॉस्पिटल