पणजी : मनात कोरोना विषाणूविषयी धास्ती आहे पण होळी साजरी करणो, धुलीवंदनाचा आनंद लुटणो याबाबत गोमंतकीयांच्या उत्साहावर जास्त मर्यादा आलेली नाही. विदेशी पर्यटकांनीही मंगळवारी गोव्यात होळी उत्सवात व धुलीवंदनात उत्साहात भाग घेतला. आमदार बाबूश मोन्सेरात यांनीही प्रथमच पणजीतील रंगपंचमीत भाग घेत रंगात न्हाणो पसंत केले.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळावा म्हणून गोवा सरकार सर्व प्रकारे जाहिरात करत आहे. कोणती काळजी घ्यावी, याविषयी सल्ले देण्याची मोहीम आरोग्य खात्याच्या यंत्रणोने सुरू ठेवली आहे. लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येणो टाळावे असा केंद्रीय आरोग्य मंत्रलयाचा सल्ला आहे. मात्र गोव्यात होळी उत्सवानिमित्त गावागावांत लोकांचे एकत्रीकरण जोरात सुरू आहे.
शहरातील गर्दीत थोडी घट दिसून येते पण ग्रामीण भागात मात्र लोक मोठ्या संख्येने एकत्र येऊन होळी उत्सव साजरा करत आहेत. एकमेकाच्या चेहऱ्याला रंग लावून मंगळवारी पणजीसह गोव्याच्या सर्व भागांमध्ये रंगपंचमी साजरी केली गेली. धुलीवंदनाचा आनंद पणजीसारख्या शहरात विदेशी पर्यटकांनीही लुटला.
पणजीतील आझाद मैदानावर एरव्ही धुलीवंदन साजरे करताना मोठी गर्दी होत असे. मात्र मंगळवारी सकाळी प्रारंभी गर्दी थोडी कमी दिसून आली. नंतर गर्दी वाढली. पणजीतील प्रमुख नागरिक, उद्योजक, राजकारणी आदी या गर्दीत सहभागी झाले. गोवा विद्यापीठाचे दोन विद्यार्थी तोंडाला मास्क लावून धुलीवंदनात सहभागी झाले. त्यांनी शिगमोत्सवाचा आनंद लुटला. सकाळपासूनच परप्रांतीय मजुरांनी पणजी बाजारपेठेच्या ठिकाणी एकमेकाला रंग लावून धुलीवंदन साजरे केले. दुपारी सांतइनेजसह अन्य भागांमध्ये धुलीवंदन सुरूच होते. युवकांनी मद्यपानाचाही आनंद लुटला.
एरव्ही पणजीत दरवर्षी धुलीवंदनात माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर र्पीकर सहभागी होत असे. गेल्यावर्षी र्पीकर अतिशय आजारी होते व त्यामुळे पणजीतील आझाद मैदानावर होळीचा कार्यक्रम रद्द केला गेला होता. नंतरच्या काही दिवसांत र्पीकर यांचे निधन झाले. यंदाही पणजीवासियांना होळी उत्सवावेळी र्पीकरांची आठवण आलीच.