लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने केलेल्या विकासामुळे, सुशासन तसेच कल्याणकारी योजनांमुळे आपला देश समृद्ध, विकसित देश होईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.
उत्तर गोव्यातील म्हापसा येथील पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नाईक बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार प्रेमेंद्र शेट, माजी मंत्री जयेश साळगांवकर, उत्तर गोवा अध्यक्ष महानंद अस्नोडकर, राजसिंग राणे, आशिष शिरोडकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
केंद्रात सत्तेत आल्याला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नाईक यांनी पक्षाच्या वतीने ३० मे ते ३० जूनदरम्यान हातीघेतलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. विविध कार्यक्रमांतून लोकसंपर्क साधला जाणार असल्याचे नाईक म्हणाले. समाजातील दुर्लक्षित, वंचित घटकांना स्वावलंबी बनविण्यावर भर दिला जाईल. युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. शेतकऱ्यांना समृद्ध करण्यावर भर दिला जाईल, असे श्रीपाद नाईक म्हणाले.