लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : अपात्रता प्रकरणात आमदार दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांनी सभापतींच्या नोटीसीला उत्तर देताना याचिकेच्या कायदेशीर वैधतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तक्रारदार गोवा विधानसभेचे सदस्य नसल्यामुळे याचिका फेटाळण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अपात्रता प्रकरणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांच्याविरुद्ध सभापती रमेश तवडकर यांच्याकडे अपात्रता याचिका सादर केली होती. या याचिकेला अनुसरून सभापतींनी आमदारांना नोटीस बजावली होती.
नोटीसीला उत्तर देताना आमदार दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांनी अपात्रता संबंधी कायद्याचा उल्लेख करून या प्रकरणात केवळ आमदारच अपात्रता याचिका करू शकतात आणि अमित पाटकर हे आमदार नसल्यामुळे त्यांची याचिका बेकायदेशीर ठरते असा दावा केला आहे. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात यावी, अशी मागणीही केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"