लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना दक्षिण गोवालोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यात मुळीच रस नाही. तसे त्यांनी अलीकडेच पक्षाच्या केंद्रीय नेत्यांना देखील कळवले आहे.
कामत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना मंत्रिपद द्यावे, असे दिल्लीत ठरले होते. मात्र एक- दोन मंत्र्यांनी कामत यांचा मंत्रिमंडळ प्रवेश गेले रोखून धरला. कामत यांनी सध्या पूर्णपणे मडगाव मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांना या वयात मडगाव सोडून दिल्लीला जाण्यात इंटरेस्ट नाही. कामत यांनी आपल्या अत्यंत जवळच्या कार्यकर्त्यांना तसेच मडगावच्या काही प्रमुख नगरसेवकांनाही दोन दिवसांपूर्वीच याची कल्पना दिली.
दरम्यान, आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची सूचनाही कुणी केलेली नाही व आपल्याला इच्छाही नाही, असे कामत यांनी काल 'लोकमत' प्रतिनिधीने विचारले असता सांगितले.