शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

दिगंबर कामत यांच्या अटकेची गरज नाही!

By admin | Published: August 20, 2015 2:16 AM

पणजी : जैका प्रकल्पासाठी लुईस बर्जर इंटरनॅशनल कंपनीकडून कथित लाच घेतल्याच्या प्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना अटक करण्यास मज्जाव

पणजी : जैका प्रकल्पासाठी लुईस बर्जर इंटरनॅशनल कंपनीकडून कथित लाच घेतल्याच्या प्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना अटक करण्यास मज्जाव करणारा निवाडा देताना पणजी विशेष न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. संपूर्ण गोमंतकीयांचे लक्ष लागून राहिलेला हा निवाडा न्या. भारत देशपांडे यांनी बुधवारी सकाळी १० वाजता दिला. क्राईम ब्रँचमध्ये बोलावल्यानंतर कामत यांनी क्राईम ब्रँचच्या कार्यालयात येऊन चौकशीस हजेरी लावली आणि कामत यांची कोठडी नेमक्या कोणत्या कारणासाठी हवी, हे पोलिसांनी स्पष्ट केले नसल्याचे सांगून न्यायाधीशांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. अर्ज मंजूर करतानाच १ लाख रुपये हमी, एक हमीदार, न्यायालयाच्या परवानगीशिवाय गोवा सोडून न जाणे, आवश्यकतेनुसार तपास एजन्सीसमोर उपस्थित राहाणे, पासपोर्ट न्यायालयात सादर करणे या अटींवर न्यायालयाने हा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. कामत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्याच्या ४९ पानांच्या आदेशात न्यायमूर्ती देशपांडे यांनी कामत हे दोन वेळा चौकशीसाठी हजर राहिल्याचे आणि तपासकार्याला सहकार्य केल्याचा उल्लेख केला आहे. कामत हे तपासासाठी सहकार्य करत नसल्याचा क्राईम ब्रँचचे वकील गुरुप्रसाद कीर्तनी यांनी केलेला दावा स्वीकारण्यात आला नाही. (प्रतिनिधी)