ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 16 - कोकणी लेखक दिलीप बोरकर आणि युवा लेखिका अन्वेषा सिंगबाळ यांना अनुक्रमे बाल आणि युवा साहित्यासाठी यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाची बैठक मणिपूरमधील इम्फाळ येथे पार पडली. तीत हे पुरस्कार निश्चित झाल्याचे कोकणी सल्लागार मंडळाचे निमंत्रक तानाजी हळर्णकर यांनी सांगितले. बोरकर यांनी लिहिलेल्या ‘पिंटूची काळभोवडी’ तर अन्वेषा यांच्या ‘सुलूस’ कवितासंग्रहाला हा पुरस्कार जाहीर झाला. अन्वेषा यांचा सुलूस पहिलाच कवितासंग्रह. बोरकर यांच्या नावावर एकूण 25 पुस्तके आहेत. 1995 मध्ये बोरकर यांना प्रथम साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. (प्रतिनिधी)