शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

जि. पं. निवडणुकीवर काँग्रेसचा बहिष्कार?

By admin | Published: February 21, 2015 2:16 AM

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर घेऊ नका, अशी मागणी करूनदेखील सरकारने पक्षीय पातळीची पद्धत लादल्यामुळे काँग्रेसने

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर घेऊ नका, अशी मागणी करूनदेखील सरकारने पक्षीय पातळीची पद्धत लादल्यामुळे काँग्रेसने या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार चालवला आहे. ‘हात’ या निशाणीवर उमेदवार रिंगणात न उतरविता अप्रत्यक्षरीत्या काही उमेदवारांना पक्षाने पाठिंबा द्यावा का, याबाबत सोमवारी अंतिम निर्णय घेण्यासाठी काँग्रेसने बैठक बोलावली आहे. पक्षीय पातळीवर जिल्हा पंचायत निवडणुका नको, अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेसने राज्यपालांना यापूर्वी दिलेले आहे. तत्पूर्वीच सरकारने वटहुकूम जारी करून कायद्यात दुरुस्तीही केली. सरकारने भाजपला सोयीचे होईल, अशा पद्धतीने जिल्हा पंचायत मतदारसंघांची फेररचना व आरक्षण केल्यानेही काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेस पक्ष स्वत:च्या निशाणीवर उमेदवारांना रिंगणात न उतरविता अप्रत्यक्षरीत्या काही उमेदवार पुरस्कृत करू पाहत आहे. सरकारने पक्षांतर बंदी कायदाही जिल्हा पंचायतींसाठी लागू केलेला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येणाऱ्या उमेदवारांनाही भाजप नंतर फोडू शकतो. याचा विचार करून काँग्रेस पक्ष निवडणुकीवर बहिष्कार टाकू पाहत आहे. मात्र, याबाबत अजून निर्णय झालेला नाही. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता काँग्रेसची राज्य कार्यकारिणी व काँग्रेस विधिमंडळ पक्ष यांची संयुक्त बैठक होणार आहे. काँग्रेसच्या माजी आमदारांनाही या बैठकीस बोलविण्यात आले आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी पक्षाची भूमिका त्या बैठकीत ठरणार आहे. काँग्रेसचे काही आमदार पक्षीय पातळीवर निवडणुका व्हाव्यात, या मताचे आहेत. (खास प्रतिनिधी)