शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

देवेगौडांचाही कळसा हट्ट

By admin | Published: September 19, 2015 2:01 AM

डिचोली : माजी पंतप्रधान तथा निधर्मी जनता दलाचे संस्थापक एच. डी. देवेगौडा यांनी शुक्रवारी कणकुंबी येथे कळसा प्रकल्पाला भेट दिली

डिचोली : माजी पंतप्रधान तथा निधर्मी जनता दलाचे संस्थापक एच. डी. देवेगौडा यांनी शुक्रवारी कणकुंबी येथे कळसा प्रकल्पाला भेट दिली. केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करून कर्नाटकला प्रलंबित असलेले काम पूर्ण करण्यास परवानगी द्यावी, यासाठी आग्रह धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कणकुंबी येथे काही दिवसांपूर्वी कुदगोळचे काँग्रेस आमदार सी. एस. शिवेळ्ळी यांनी आपल्या समर्थकांसह दोन दिवस शक्तिप्रदर्शन घडवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता शुक्रवारी निधर्मी जनता दलाने याप्रश्नी आपणही मागे नाही, हे दाखवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शुक्रवारी कणकुंबी येथे देवेगौडा पोहचले. त्यांनी कळसा प्रकल्पाची जागा त्याचप्रमाणे सुर्ल आणि कळसा नाल्याचा उगम होतो, त्या जागेची पाहणी केली. देवेगौडा म्हणाले की, मी या प्रकरणात लक्ष घातले आहे. केंद्र सरकारने उत्तर कर्नाटकातील लोकांची गंभीर स्थिती बघून न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. या वेळी त्यांच्यासोबत कर्नाटक निजद पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते. ही सर्व मंडळी कळसा कालव्याचे काम पूर्ण व्हावे याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत होती. दरम्यान, देवेगौडा हे कणकुंबीतील मंदिराला भेट देणार असल्याचे समजताच उपसरपंच नंदकुमार गावडे गावकऱ्यांसह उपस्थित होते. माउली देवस्थानचे अध्यक्ष प्रा. बबन दळवी यांनी या प्रकल्पामुळे माउली मंदिराच्या सभागृहाला धोका निर्माण झाला असून ही समस्या मांडण्याचे ठरवले होते. मात्र, इतक्या महत्त्वाच्या प्रश्नी लक्ष देण्यास वेळ काढला नसल्याबद्दल ग्रामस्थांनी माजी पंतप्रधानांच्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)