मतभेद नकोत, लोकसभेसाठी सज्ज राहा; साखळीत काँग्रेसची चिंतन बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 01:46 PM2023-12-19T13:46:27+5:302023-12-19T13:47:32+5:30

काहीजणांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

do not want differences be ready for lok sabha said contemplative meeting of congress in sankhali goa | मतभेद नकोत, लोकसभेसाठी सज्ज राहा; साखळीत काँग्रेसची चिंतन बैठक 

मतभेद नकोत, लोकसभेसाठी सज्ज राहा; साखळीत काँग्रेसची चिंतन बैठक 

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : साखळी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अल्प मतांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर तातडीने चिंतन होणे गरजेचे होते. मात्र, तब्बल २२ महिने काँग्रेस गटात सामसूम होती. आता पुन्हा नव्या जोमाने संघटन मजबूत करून लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांनी संघटित राहावे. तसेच अधिकाधिक मते मिळविण्यासाठी सक्रिय राहावे, हेवेदावे विसरून संघटनकार्यासाठी जोमाने कार्यरत राहावे, असे आवाहन काँग्रेस नेते एम. शेख यांनी साखळी येथे केले.

के. साखळी मतदार संघातील काँग्रेस गट समिती प्रमुख, कार्यकर्ते यांची विशेष बैठक डेल्मन सभागृहात झाली. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तातडीने उमेदवाराची घोषणा करण्याचा आग्रह कार्यकर्ते व नेत्यांनी धरला.

पेटकर यांचा काँग्रेस प्रवेश

यावेळी राष्ट्रवादीचे लवू पेटकर व अन्य काहींनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी अंकुश कामत, सूर्यकांत गावडे, खेमलो सावंत, लक्ष्मीकांत परब यांनी विचार व्यक्त केले. जयेश आमोणकर, रियाज सय्यद, वीरेंद्र शिरोडकर, जोएल आंद्रेद व इतर त होते. लोकसभा निवडणुकीचा उपस्थितः उमेदवार तातडीने जाहीर करावा, असा आग्रह बैठकीत धरण्यात आला.

१५ बूथ समित्या स्थापणार : शेख

शेख म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेस नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत चांगले काम केले. त्यानंतर चिंतन होणे व चुका सुधारणे या गोष्टी अपेक्षित होत्या. आता पुन्हा नव्या जोमाने सर्वांनी कामाला लागावे. अनेक कार्यक्रम पक्षाने निश्चित केलेले असून, १५ विविध बूथ समित्या सुरु करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसची ताकद दाखवून द्या : भिके

विजय भिके म्हणाले, लोकसभेसाठी संघटित होऊन काम करण्याची गरज आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता काँग्रेसची ताकद दाखवून देण्यासाठी सक्रिय राहण्याचे आवाहन केले, लोकसभेसाठी आपणही इच्छुक उमेदवार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उमेदवार निवडताना पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांना न्याय मिळवून द्यावा, असा सूर त्यांनी व्यक्त केला.

उमेदवाराची घोषणा लवकर व्हावी : गावस

माजी आमदार प्रताप गावस म्हणाले, उमेदवार निवडताना पक्षाकडून उशीर केला जातो. केंद्रीय नेते अभ्यास करून निर्णय घेणार व ते ठरवणार आदी गोष्टी सांगितल्या जातात. मात्र, यापुढे असे करू नये. योजनांचा लाभ काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळवताना त्रास होतो. पक्षाने या सर्व गोष्टींचा विचार करावा. कार्यकर्त्यांना गृहित धरू नये, अशा सूचना त्यांनी केल्या.

पक्षांतर केलेल्यांवर हवी ठोस भूमिका

काँग्रेसचे आमदार पक्षांतर करतात, त्याबाबत ठोस भूमिका घेणे, पक्ष संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांची होणारी पिळवणूक रोखणे, लोकसभेसाठी संघठित कार्य करण्याचे आवाहन सुनीता येरेकर यांनी केले.

कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवा : ब्लेगन

प्रवीण ब्लेगन म्हणाले, राज्यातील काँग्रेस संघटन मजबूत होणे आवश्यक आहे. साखळी मतदार संघातील कार्यकर्त्यांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सत्ताधाऱ्यांकडून योजनांचा लाभ मिळवून देण्यात अडथळे निर्माण केले जात आहेत.

 

Web Title: do not want differences be ready for lok sabha said contemplative meeting of congress in sankhali goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.