पणजी - सांताक्रुझ व सांतआंद्रे या दोन मतदारसंघांतील पंचायतींनी गेल्या महिन्यात ग्रामसभांमध्ये ठराव घेऊन पीडीएला विरोध केला होता व तसे नगर नियोजन खात्यालाही कळवले होते. तरी देखील या खात्याचे मंत्री विजय सरदेसाई हे दिशाभुल विधाने करून लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप सांताक्रुध व सांतआंद्रेच्या नागरिकांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिशषदेत सांगितले.
उद्या रविवारी चिंबल, आदोशी-मंडुर, शिरदोन येथे होणा-या ग्रामसभांमध्ये पीडीएस विरोध केला जाईल असे येथील कार्यकर्त्यांनी सांगितले. या वेळी रुदोल्फ फर्नांडिस, माजी मंत्री व्हिक्टोरि़या फर्नांडिस, सांताक्रुझचे सरपंच मारीयानो आरावजो, आर्थुर Þडिसोझा, पिटर गोन्साल्विस, सांत आंद्रेतील नागरिक रामा काणकोणकर आदी उपस्थित होते.
नगर नियोजन मंत्री सरदेसाई यांनी फातोर्डा येथे मोठ्या उंच इमारती बांधून उभी विकास पध्दत करून दाखवावी असे आव्हान रूदोल्फ यांनी दिले. तसेच फक्त बाबुश मोन्सेरात यांनाच समाधानी करण्यासाठी ही पीडीए स्थापन केली असल्याचे ते म्हणाले. या पीडीएमुळे संबंध गोव्यावर बांधकाम क्षेत्रात परिणाम होणार आहे. यामुळे बांधकामाचे साहित्य महागणार असल्याचे त्यांनी सांगितले. सांताक्रुझ व इतर गावांतील लोक, ग्रामपंचायत, नागरिक, समाज कार्यकर्ते एकत्र येऊन या विरोधात लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सांताक्रुझ, सिरिदांव, आदोशी मंडूर येथील लोकांना विश्वासात न घेता ग्रेटर पणजी पीडीए स्थापन करण्यात आली आहे. संपूर्ण सांताक्रुझ हे इको सेंसेटिव्ह परिसर असून पीडीएसाठी आम्ही तयार नाहीत असे डिसोझा म्हणाले. बोंडवोल तालाव संरक्षीत ठेवण्याचे आश्वासन देऊन सुध्दा नगर नियोजन मंत्र्यांनी आश्वासन न पाळता ती पीडीए अंतर्गत घेतली. बोंदवोल तालावाजवळ बांधकाम करणाºया बरून इब्राहीम यांच्या विरोधात एफआ़यआर नोंद करून १ वर्ष झाले तरीही अजून त्याला अटक व आरोपपत्र दाखल केलेले नाही. यातून नगर नियोजन खाते व बिल्डर्स बरोबर जवळीक असल्याचे समजते असे ते म्हणाले. बोंदवोल वॅटलॅण्ड जाहिर करण्यासाठी मागणी केल्याची दखल अजून घेतली जात नाही असेही ते म्हणाले.
पीडीएला विरोध करणारा सांताक्रुझ ग्रामपंचायतीचा ठराव १७ जानेवारीला मुख्यमंत्री, नगर नियोजन मंत्र्यांना दिला होता असे सरपंच अरावजो यांनी सांगितले. जय रघुवीर कंस्ट्रक्श्नला परवाना ग्रामपंचायतीने दिला नसून तो नगर नियोजन खात्याने दिला असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. नगर नियोजन मंत्र्यांनी लोकांची फसवणुक करू नये असे ते म्हणाले.
पीडीएच्या नियोजन समितीची हुकुमशाही चालली असून त्यांनी गावातील लोकांना विश्वासात घेतले नाही. या पीडीए समितीने त्वरीत राजिनामा द्यावा नाहीतर आंदोलन छेडू असे काणकोणकर म्हणाले. गोवा सांभाळण्यासाठी जिवन समर्पीत करण्यासाठी तयार असल्याचे फर्नांडिस म्हणाल्या. सरदेसाई यांनी लोकांची फसवणुक करू नये असे त्यांनी सांगितले.