शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

यंदा ‘नीट’ नकोच!

By admin | Published: May 03, 2016 1:54 AM

पणजी : वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालय प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील ‘नीट’ परीक्षा येत्या शैक्षणिक वर्षात लागू न करता २0१७च्या

पणजी : वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालय प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील ‘नीट’ परीक्षा येत्या शैक्षणिक वर्षात लागू न करता २0१७च्या शैक्षणिक वर्षापासून लागू करावी, अशी मागणी करणारी पुनर्विलोकन याचिका गोवा सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केली. या याचिकेवर आज मंगळवारी सुनावणी होणार आहे. अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली. राज्यात जीसीईटीला नोंदणी केलेल्या ५६00 विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असल्याने सरकार या प्रश्नावर गंभीर आहे. अंतिम पर्याय म्हणून ‘नीट’ची जुलैमध्ये एकच परीक्षा असावी, असेही सरकारचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाने एमबीबीएस, बीडीएस तसेच पदव्युत्तर प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील एनईईटी (नीट) परीक्षा बंधनकारक असल्याचे शिक्कामोर्तब केल्याने राज्यातील विद्यार्थी आणि पालक धास्तावले आहेत. गोमेकॉ व दंत महाविद्यालय प्रवेशासाठी जीसीईटी परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी केली होती; मात्र ऐनवळी राष्ट्रीय स्तरावरील एनईईटी परीक्षा लादण्यात आल्याने विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. शैक्षणिक वर्ष फुकट जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही ‘नीट’ परीक्षा यंदा नकोच, अशी भूमिका घेतली आहे. सीबीएसईने नीट परीक्षेसाठी दोन तारखा जाहीर केल्या. त्यानुसार १ मे रोजी पहिल्या टप्प्यातील परीक्षा झाल्या. २४ जुलै रोजी दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा होणार आहे. येत्या १0 व ११ मे रोजी जीसीईटी परीक्षा होणार असून परीक्षा तोंडावर असताना न्यायालयाचा हा आदेश आला. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली. (प्रतिनिधी)