पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळा बाहेर भाजी विक्री बंद करा, अन्यथा कारवाई करु असा इशारा चार गाेमंतकीय विक्रेत्यांना सांताक्रुझ पंचायतीने दिला आहे. सरकारने त्यांच्या पोटावर येऊ नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांनी केली आहे.
या भाजी विक्रेत्यांमुळे गोमेकॉ बाहेर वाहतूक कोंडी होत असल्याचे म्हणत सांताक्रुझ पंचायतीने या भाजी विक्रेत्यांना तेथून हटवण्यास सांगितले आहे. या ठिकाणी १२ विक्रेते आहेत. मग केवळ या चार गोमंतकीय विक्रेत्यांवरच अन्याय का ? वाहतूक कोंडी होणे खरे तर अशक्य आहे. कारण हे विक्रेते भाजी व फळे घेऊन रस्त्याच्या कडेला बसतात. रस्त्याच्या मधोमध बसत नाही अशी टीका त्यांनी केली.
ॲड. कुतिन्हो म्हणाल्या, की बांबोळी येथील गोमेकाॅ बाहेर गुरुदास दिवेकर, रेश्मा काणकोणकर, हर्षा गावस व एक अन्य एक भाजी विक्रेती महिला असे मिळून चार गोमंतकीय विक्रेत्यांना सांताक्रुझ पंचायतीने तेथून हटण्याचे आदेश दिले आहेत.