शहरं
Join us  
Trending Stories
1
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
2
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
3
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
5
मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका
6
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
7
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
8
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
9
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
10
Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना
11
WhatsApp वर सुरू आहे स्कॅमर्सकडून फ्रॉडगिरी, स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असल्याल वापरा या टिप्स
12
"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट
13
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
14
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
16
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
17
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
18
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
19
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
20
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 

नारी शक्तीला प्रगतीची दारे खुली, महिलांना स्वावलंबी करण्यात भाजप सरकारचा मोठा वाटा : मुख्यमंत्री सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 4:21 PM

महिलांसाठी 33 टक्केराजकीय आरक्षण देऊन भारतीय राजकारणात स्त्री शक्तीला मोठा मान दिलेला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.

विशांत वझे 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात देशातील नारी शक्तीला चौफेर प्रगतीची द्वारे खुली झालेली असून आर्थिक, राजकीय ,सामाजिक ,सांस्कृतिक अशा क्षेत्रात महिलांनी उत्तुंग झेप घेत आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवत समाज कुटुंब प्रदेशासाठी मोठे योगदान देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. महिलांसाठी 33 टक्केराजकीय आरक्षण देऊन भारतीय राजकारणात स्त्री शक्तीला मोठा मान दिलेला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.

 महिला दिनाच्या निमित्ताने रवींद्र भवनात आयोजित नारीशक्ती वंदन संमेलनात महिलांची मोठी उपस्थिती लाभली. यावेळी व्यासपीठावर भाजप महिला नेत्या सुलक्षणा सावंत ,नगराध्यक्ष रश्मी देसाई ,ग निकिता नाईक, विनंती पार्सेकर ,सिद्धी पोरोब, तसेच विविधमहिला सरपंच पंच उपसरपंच नगरसेविका मंडळ अध्यक्ष गोपाल सूर्ल करं व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पंतप्रधानांनी अकरा कोटी गरीब लोकांना घरे बांधून देताना ती महिलांच्या नावावरकरण्याचा कायदा आणला. तसेच  पाणी रस्ते वीज सिलेंडर अशा सगळ्या योजना दारोदारी पोहोचवताना महिलेला आपले घर चालवताना सर्व प्रकारचा दिलासा मिळेल अशा प्रकारची व्यवस्था गेल्या दहा वर्षात केली. शेती कौशल्य विकास तसेच बिनव्याजी कर्ज व इतर माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्यात भाजप सरकारचे मोठे योगदान आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

भारत देश आपला परिवार आहे त्यामुळे घरोघरी कुटुंबातील सदस्य मोदींचा जय जय कार करीत असून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होण्यासाठी सज्ज आहेत. महिला शक्ती ही मोठी शक्ती असून पन्नास टक्के महिलांचा सहभाग देशातील राजकारणात निर्णय ठरत असून महिलांना खऱ्या अर्थाने सबल करण्याचे महान कार्य मोदीजींनी केले आहे असे त्यांनी सांगितले. गोव्यातही स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर योजनेच्या मार्फत महिला मोठ्या संख्येने पुढे सरसावत स्वावलंबी होत असल्याचे खूप समाधान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले.

काँग्रेस राजवटीत गेल्या साठ वर्षात महिलांसाठी कोणत्याही योजना आखल्याचे आठवत नाही, उलट पक्षी देशाचे तुकडे करण्यात काँग्रेसच्या नेत्यांनी धन्यता मानली अनेक घोटाळे केले काँग्रेसचे पंतप्रधान रिमोट कंट्रोल प्रमाणे वागत. त्यामुळे घोटाळा काँग्रेसला आज देशातील जनतेने पूर्णपणे नाकारले असून चारशे पार भाजप सरकार पुढे सरसावत पुन्हा एकदा देशाचे नेतृत्व करण्यास सज्ज असून महिलांनी पुन्हा एकदा भाजपला सर्व प्रकारचे साथ द्यावी असे आवाहन यावेळी डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केले .

यावेळी त्यांनी महिलांसाठी आखलेल्या योजनांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तसेच सरकारी योजनांना चालना देण्यासाठी महिला मंडळ स्वयंसहाय गट यांच्यातर्फे कार्य करणाऱ्या महिला प्रतिनिधींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी महिलांसाठी विशेष संबोधन केले त्याचे थेट प्रक्षेपण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हजारो महिलांनी पाहिले. सकाळी नारीशक्ती वंदन संमेलना अंतर्गत भव्य महिला शक्तीची रॅली साखळी हॉस्पिटल रवींद्र भवन या दरम्यान काढण्यात आली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

सुलक्षणा सावंत यांनी नारीशक्तीला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर स्वयंपूर्ण तसेच बलवान कणखर बनवण्यात मोदींच्या विविध योजना खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरलेला असून आज सारी महिला शक्ती भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून पुन्हा एकदा देशात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री तसेच अन्य महिला मान्यवरांच्या उपस्थितीत महिला संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत