नारायण गावस
पणजी: सोनी पिक्चर्स निर्मित 'आँख मिचोली' या हिंदी कॉमेडी चित्रपटावर अपंगत्व असलेल्या व्यक्तींची आणि त्यांच्या अपंगत्वाची चेष्टा करण्यात आल्याने डिसॅबिलिटी राइट्स असोसिएशन ऑफ गोवा (ड्रॅग) ने तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.
हा चित्रपट अपंग व्यक्ती आणि त्यांच्या अपंगत्वाची चेष्टा करतो आणि अपंग व्यक्तींच्या हक्कांच्या कलम ९२ चे उल्लंघन करतो. यासाठी ड्रॅगने जिल्हाधिकारी आणि अपंग व्यक्तींसाठी असलेल्या राज्य आयुक्तांना पत्र लिहून गोव्यात या चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे.ड्रॅगने ने माहिती आणि प्रसारण आणि सामाजिक न्याय मंत्रालयांना पत्र लिहून दिव्यांग व्यक्तींची थट्टा करणाऱ्या आणि त्यांना वाईट प्रकाशात दाखवणाऱ्या चित्रपटांना प्रमाणपत्र देण्यासाठी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांना तत्काळ हटवण्याची मागणी केली आहे.
ड्रॅगने ने या चित्रपटाच्या निर्माता दिग्दर्शक आणि कलाकारांविरुद्ध अपंग व्यक्तींची आणि त्यांच्या अपंगत्वाची चेष्टा केल्याबद्दल आणि अपंग व्यक्तींच्या हक्क कायद्याच्या कलम ९२ चे उल्लंघन केल्याबद्दल पोलीस तक्रार देखील दाखल केली आहे. ड्रॅगने ने गोव्यातील मल्टिप्लेक्सना कलम ९२ नुसार फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.